अफगाणिस्तानातून जवळपास ४०० जणांना आणले भारतात

अफगाणिस्तानातून जवळपास ४०० जणांना आणले भारतात

Indian nationals sit aboard an Indian military aircraft at the airport in Kabul on August 17, 2021 to be evacuated after the Taliban stunning takeover of Afghanistan. (Photo by STR / AFP)

अफगाणिस्तानमध्ये तालिबानींची सत्ता आल्यापासून तेथे असलेल्या भारतीयांना अफगाणिस्तानबाहेर काढण्याचे काम केंद्र सरकारने यशस्वीरित्या सुरू केले आहे. २२ ऑगस्टला भारताने जवळपास ४०० लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढले. काबुलमधील ढासळती परिस्थिती लक्षात घेता तेथे राहात असलेल्या भारतीयांना भारतात आणण्यात येत आहे.

भारतीय हवाई दलाच्या हेवी लिफ्ट मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टच्या मदतीने काबुलमधून दिल्लीजवळच्या हिंडन एअरबेसवर जवळपास १६८ लोकांना आणण्यात आले. त्यात १०७ भारतीय आणि २३ अफगाणी शीख व हिंदू यांचा समावेश आहे. त्यानंतर दुशान्बे येथून ८७ भारतीय आणि दोन नेपाळी नागरिकांनाही सुरक्षित अफगाणिस्तानाबाहेर काढण्यात आले. त्याआधी, त्यांना भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने ताजिकिस्तानात नेण्यात आले होते. तिथून त्यांना आता भारतात आणण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसातं नाटो आणि अमेरिकेच्या विमानांच्या सहाय्याने १३५ भारतीयांना काबुलमधून दोहा येथे नेण्यात आले. आता त्यांना दोह्याहून दिल्लीत आणण्यात आले आहे.

भारताने अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका, कतार, ताजिकिस्तान व इतर मित्र देशांची मदत घेतली आहे. ज्या १६८ लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आले त्यात अफगाण कायदेमंडळातील सदस्य अनारकली होनरयार व नरेंद्रसिंग खालसा यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

विम्याच्या बहाण्याने त्यांनी घातला इतक्या लाखांचा गंडा

एसटीच्या लोगोलाच केला ‘जय महाराष्ट्र’

त्या मुलीने अचूक ओळखले ‘छोटे सर’ला आणि पाठवले तुरुंगात

लस नाही म्हणता म्हणता महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भात सांगितले की, भारतीयांना अफगाणिस्तानातून सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरूच राहील. काबुल येथून दोहात नेण्यात आलेल्या भारतीयांपैकी बहुसंख्य हे अफगाणिस्तानातील कंपन्यांमध्ये काम करत होते.

प्रथम ज्या विमानाच्या सहाय्याने भारतीयांना आणण्यात आले, त्यात ४० भारतीयांचा समावेश होता. भारतीय दुतावासातील ते कर्मचारी होते. दुसऱ्या सी-१७ विमानाने १५० लोकांची सुटका करण्यात आली.

Exit mobile version