ऑस्ट्रेलियात खलिस्तानी समर्थकांची गुंडगिरी वाढत आहे. खलिस्तानी समर्थकांच्या गुंडगिरीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये खलिस्तानी समर्थक भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहेत. तिरंगा घेऊन खलिस्तानी कारवायांचा निषेध करत असतांना भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आहे.
ही संपूर्ण घटना मेलबर्नच्या फेडरेशन स्क्वेअर यथे घडली आहे. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. एका तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही भारतीय विद्यार्थी हातात तिरंगा ध्वज घेऊन चौरस्त्यावर उभे असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे खलिस्तान समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. खलिस्तानी समर्थकांनी विद्यार्थ्यांकडून तिरंगा ध्वज हिसकावून घेतला आणि त्याचा अपमानही केला.
तिरंग्यासाठी भारतीयांनी खलिस्तान समर्थक जनमत चाचणीला विरोध केला. त्यानंतरच हाणामारी सुरू झाली. हल्लेखोरांनी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियातील खलिस्तान समर्थकांच्या या भारतविरोधी कारवायांचा मी निषेध करतो. अशा समाजकंटकांना देशातील शांतता आणि सलोखा बिघडवायचा आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा , असे सिरसा यांनी।म्हटले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडे आहे हे ब्रह्मास्त्र !
शनि शिंगणापूरला १ कोटीचे दान करणारे ओदिशाचे मंत्री नबा दास गोळीबारात मृत्यूमुखी
अर्थसंकल्पात या गोष्टींमध्ये दिलासा मिळण्याचे संकेत
ठाकरे गट हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे?
खलिस्तानी कारवाया वाढल्या
गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात खलिस्तानी कारवाया वाढल्या आहेत. अलीकडे खलिस्तान समर्थकांनी हिंदू मंदिरांवरही अनेकदा हल्ले केले आहेत. १७ जानेवारीला मेलबर्नमधील स्वामीनारायण मंदिरावर हल्ला झाला होता. मंदिराच्या भिंतींवर खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या. भारतीय उच्चायुक्तांनी जारी केलेल्या निवेदनात या हल्ल्यावर टीका करण्यासोबतच खलिस्तानी समर्थकांच्या वाढत्या कारवायांवर चिंता व्यक्त केली होती. भारतीय उच्चायुक्तालयानेही या घटनांचा तीव्र निषेध केला होता.