रशिया आणि युक्रेन या दोन देशात युद्ध सुरू असून या युद्धात एका भारतीयाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यात २१ फेब्रुवारी रोजी गुजरातमधील तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हेमिल मंगुकिया (वय २३ वर्षे) असे या तरुणाचे नाव असून तो सुरतमधील पाटीदार वराछा येथील आनंदनगर वाडीचा रहिवासी होता. हेमिल यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेमिलचे वडील अश्विन मंगुकिया यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की त्यांनी रशियन अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या मुलाचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी सुरत येथे आणावा. २१ फेब्रुवारी रोजी त्याचे निधन झाले आहे. त्याचा मृतदेह कोठे आहे याची कल्पना नसून सध्या आम्ही तिथे कोणाच्याही संपर्कात नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अश्विन यांनी सांगितले की, हेमिलशी त्यांचे २० फेब्रुवारीला शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर २१ फेब्रुवारीला हॅमिलचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. त्याआधी झालेल्या संवादात त्याने आपल्या वडिलांना सांगितले की, तो ठीक आहे. परंतु, त्याने त्याच्या कामाबद्दल कोणतीही माहिती दिली नसल्याचे सांगितले. कुटुंबाला फक्त हे माहित होते की, तो रशियामध्ये मदतनीस म्हणून काम करतो. त्यांना नंतर कळले की, हेमिलला युक्रेनच्या सीमेवरील युद्धक्षेत्रात पाठवण्यात आले होते.
२३ फेब्रुवारीला हेमिलच्या मृत्यूची बातमी समजल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. हैदराबादचा रहिवासी असलेल्या इम्रानने सायंकाळी फोन करून त्याच्या मृत्यूची माहिती दिली. युद्धक्षेत्रात क्षेपणास्त्र हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. इम्रान याचा भाऊ हेमिलसोबत होता. त्याने आम्हाला या घटनेबद्दल सांगितले.
हे ही वाचा:
प्रखर राष्ट्रभक्त, हिंदुत्व विचारांचे पुरस्कर्ते, क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन
ठाकरे, शरद पवारांची स्क्रीप्ट जरांगे बोलत आहेत!
रांचीत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
२२ वर्षांपासून फरार असलेला दहशतवादी भुसावळ मध्ये सापडला!
माहितीनुसार, हेमिलने १२ वी नंतर शिक्षण सोडून त्याच्या चुलत भावांसोबत एक छोटासा भरतकामाचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, हेमिल हा रशियानाध्ये हेल्परच्या नोकऱ्या देणाऱ्या वेबसाइटद्वारे एका एजंटच्या संपर्कात आला.