27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाभारतीय महिला हॉकी संघाचे स्वप्न भंगले

भारतीय महिला हॉकी संघाचे स्वप्न भंगले

Google News Follow

Related

ब्रिटनकडून ३-४ अशी हार

ऑलिम्पिकमधील पहिले पदक जिंकण्याचे भारतीय महिला हॉकी संघाचे स्वप्न शुक्रवारी भंगले. ब्रिटनविरुद्धच्या या ब्राँझपदकाच्या अत्यंत रोमहर्षक अशा सामन्यात भारताला ३-४ अशी हार पत्करावी लागली. पुरुषांनी जर्मनीला नमवून ब्राँझपदक जिंकल्यानंतर महिलाही ती कामगिरी करतील अशी आशा होती. भारतीय महिलांनी तगडा प्रतिकारही केला, पण गेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्ण विजेत्या ब्रिटनला त्यांना नमविता आले नाही.

चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये घेतलेल्या ८ पेनल्टी कॉर्नर्सवरून ब्रिटनची दिसलेली आक्रमकता त्यांना पदक मिळवून देण्यास कारणीभूत ठरली. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ एकही गोल नोंदवू शकले नव्हते. पण दुसरा क्वार्टर जबरदस्त राहिला.या सत्रात दोन्ही संघांनी मिळून पाच गोल केले. त्यात १६व्या मिनिटाला ब्रिटनने आपले गुणांचे खाते उघडलेच पण २-० अशी आघाडीही घेतली. मात्र त्यानंतर भारताच्या गुरजित कौरने केलेले २ गोल आणि नंतर वंदना कटारियाचा एक गोल या जोरावर भारताने ३-२ अशी आघाडी घेत सामन्यात चांगलीच रंगत निर्माण केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये पिअर्न वेब होलीने ब्रिटनसाठी तिसरा गोल करत बरोबरी साधून दिली. या सत्रात भारताला खरे तर चार पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारताला यश आले नाही. मात्र ब्रिटननेही या सत्रात जोरदार आक्रमणे केली. तरी भारताची गोलरक्षक सविताने पुरुष गोलरक्षक श्रीजेशप्रमाणेच भिंत बनून उभी राहात ब्रिटनचे आक्रमण थोपवून धरले.

हे ही वाचा:
बारावीचा निकाल यंदा फर्स्ट क्लास! त्यामुळेच वाढली चिंता

७६ वर्षांचा ‘लिटिल बॉय’

लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनाला राम राम

प्रत्येक हॉकी खेळाडूसाठी पंतप्रधान मोदींचे खास ट्विट

चौथ्या सत्रात मात्र भारतीय महिला आक्रमणात खूपच कमी पडल्या. त्या तुलनेत ब्रिटनने जोरदार मुसंडी मारत तब्बल ८ पेनल्टी कॉर्नर घेतले आणि त्याचा परिणाम त्यांना आणखी गोल करून मिळाला. भारताला मात्र या सत्रात अवघा एकच पेनल्टी कॉर्नर मिळविता आला. स्वाभाविकच भारताला हार पत्करावी लागली. पहिलेवहिले ऑलिम्पिक पदक मिळविण्याची संधी हुकल्यामुळे भारतीय खेळाडूंना अश्रु आवरता आले नाहीत. ब्रिटनने मात्र सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले.

spot_img
पूर्वीचा लेख
आणि मागील लेख

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा