… म्हणून भारतीय महिलांचं होतंय कौतुक!

… म्हणून भारतीय महिलांचं होतंय कौतुक!

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून रविवारी या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध झाला. या सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने दमदार सुरुवात केली. मात्र, सामन्यानंतर भारतीय संघातील महिलांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या दोन्ही देशांमध्ये कितीही वाद, मतभेद असले तरी खेळाच्या मैदानात मात्र खिलाडू वृत्तीने दोन्ही संघातील खेळाडू गप्पा मारताना दिसत होते.

रविवारच्या समन्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारुफ ही आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला घेऊन आली आहे. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडू हरमन कौर, शेफाली वर्मा, स्मृती मानधना आणि इतर महिला खेळाडू या लहानगी सोबत गप्पा मारताना आणि खेळताना दिसत आहेत. महिला खेळाडूंचा हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आपल्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. युद्ध आणि सीमेवरील तणावाच्या या वातावरणात ही दृष्य शांतता आणि आशेचं प्रतीक आहेत. स्त्रिया हुशार असतात हे माहीतच होतं, असे कैफने लिहिले आहे.

हे ही वाचा:

को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी एनएसईच्या चित्रा रामकृष्ण यांना अटक

मुंबईत गाड्या ‘टो’ न करण्याचा प्रयोग

भारतीय महिलांनी पाकिस्तानला नमवून केली वर्ल्डकपची दमदार सुरुवात

झेलेन्स्की हिटलिस्टवर

पाकिस्तान महिला संघाची कर्णधार बिस्माह मारुफ ही आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला घेऊन न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे सर्वच स्तरावरुन मारुफ हिचे कौतुक होत आहे. मारूफ ही तिच्या गरोदरपणामुळे क्रिकेटला अलविदा म्हणणार होती. पण तिने विश्वचषक खेळण्याचा निर्णय घेतला. आई झाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात आलेल्या तिच्या पुनरागमनामुळे पाकिस्तानच्या संघाला चालना मिळाली आहे.

Exit mobile version