युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. त्यातच आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

युक्रेनचे सुरक्षा रक्षक यांच्याकडून भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे. पोलंडमध्ये जाण्यासाठी फक्त युक्रेन नागरिकांना परवानगी दिली आहे. जे भारतीय विध्यार्थी पोलंडमध्ये जात होते त्यांना मारहाण केली आहे. त्या प्रकरणाची माहिती युक्रेनमध्ये अडकलेली एक भारतीय विद्यार्थी साक्षी इजनकर हिने दिली आहे.

साक्षी इजनकर या विद्यार्थीनीने झी २४ तासला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “आम्ही जेव्हा युक्रेन-पोलंड सीमेवर आलो तेव्हा आम्हाला सुरक्षा रक्षकांनी घेरले होते. आम्हाला पोलंड प्रवेशद्वारावर प्रवेश देण्यात आला नाही. तेथून केवळ युक्रेनच्या नागरिकांना पोलंडमध्ये प्रवेश दिला जात होता. खूप विनवण्या केल्यानंतर केवळ भारतीय मुलींना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी भारतीय मुलांना बेदम मारहाण केली.” अशी माहिती तिने सांगितली आहे.

पोलिसांनी मारहाणीसोबतच मुलांचा छळही केला आहे. ज्यांना अस्थमाचा त्रास होता त्यांना मारहाण करून त्यांना कसा श्वास घेता येत नाही असे दाखवून दिले आहे. यानंतर रात्री ११ ते १२ च्या दरम्यान मारहाण केल्यानंतर त्यांना पोलंडमध्ये प्रवेश देण्यात आला.

हे ही वाचा:

भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक

पेशावरमध्ये भीषण स्फोट! दोन पाकिस्तानी सैनिक ठार

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी टांझानियाच्या भाऊ- बहिणीचे केले कौतुक

एलोन मस्क यांनी युक्रेनला केली ‘ही’ मदत

एकूणच युद्धाच्या छायेतील युक्रेनमधून अनेक लोक शेजारी देशांचा आसरा घेत सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत आहेत. मात्र, यात भारतीयांसोबत दुजाभाव केला जात आहे. आधी युक्रेनच्या नागरिकांना प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप भारतीय विद्यार्थ्यांनी केला आहे.

Exit mobile version