ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडले

जसमीन कौर हिची हत्या केल्याची कबुली तारिकजोत सिंग याने दिली.

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडले

ऑस्ट्रेलियातील एका भारतीय नर्सिंग विद्यार्थिनीचे तिच्या माजी प्रियकराने मार्च २०२१ मध्ये अपहरण करून तिला जिवंत गाडले होते. या खटल्याची सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झाली. अ‍ॅडलेड शहरातील जसमीन कौर हिची हत्या केल्याची कबुली तारिकजोत सिंग याने दिली.

२१ वर्षीय कौर हिचे ५ मार्च २०२१ रोजी सिंहने तिच्या कामाच्या ठिकाणाहून अपहरण केले होते, सिंगने मित्राकडून घेतलेल्या कारच्या मागे केबल बांधून कौरला ६५० किमी अंतर दूर नेले. वृत्तानुसार, सिंगने कौरचा गळा कापला. मात्र तो खोलवर न कापल्याने ती जिवंत होती. नंतर, तिला दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्यातील दुर्गम अशा भागात एका ठिकाणी जिवंत पुरण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात शिक्षा सुनावताना या घटनेचे भयानक तपशील समोर आले. कौर हिची बाजू मांडताना वकिलांनी पीडितेला संपूर्ण दहशतीचा सामना करावा लागला, असे नमूद केले.

‘तिला जाणीवपूर्वक त्रास सहन करावा लागला होता. तिला श्वास घेतानाही तिच्या नाकात मातीचे कण जात होते. तिला माती गिळावी लागत होती. अशा प्रकारे ती दहशतीत मेली,’ असे वकिलाने न्यायालयापुढे सांगितले. त्यानंतर ६ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. ‘कौरला ज्या पद्धतीने मारण्यात आले, ते खरोखरच एक असामान्य पातळीचा क्रूरपणा होता. तिचा गळा केव्हा कापला गेला हेही तिला कळले नाही. ती केव्हा किंवा कशी आली किंवा त्या थडग्यात कधी ठेवली गेली, हेही तिला कळले नाही. ही एक हत्या होती जी सूडाची कृती किंवा सूड म्हणून केली गेली होती,’ असे वकिलाने न्यायालयापुढे मांडले.

या दोघांचे नातेसंबंध तुटल्यानंतरही तारिकजोत सिंग तिला त्रास देत होता. तारिकजोत सिंगने तिचा पाठलाग केल्याची पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर एका महिन्यानंतर जसमीन कौरची हत्या करण्यात आली होती, असे सरकारी वकिलांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा जसमीन कौरची आई देखील उपस्थित होती. तिने सांगितले की, तारिकजोत तिच्या मुलीसाठी वेडा झाला होता. मात्र तिने त्याला शंभरवेळा नकार देऊनही तो तिचा पाठलाग करत होता. तारिकजोतने कौरला तिच्या मृत्यूपर्यंत अनेक संदेश लिहिले होते. “मी अजूनही जिवंत आहे, हे तुझे दुर्दैव आहे. थांबा आणि पाहा. उत्तर मिळेल, प्रत्येकाला उत्तर मिळेल,’ असे एका संदेशात त्याने म्हटले आहे.

या दोघांचे नातेसंबंध संपल्यानंतरही आलेल्या नैराश्यातून तारिकजोत बाहेर पडू शकला नाही आणि त्याने हत्येची योजना आखली. जसमीन कौरच्या हत्येच्या प्राथमिक तपासादरम्यान तारिकजोतने आरोप नाकारले. तिने आत्महत्या केल्याचा दावा त्याने केला होता. तसेच, त्याने नंतर तिचा मृतदेह पुरल्याचे सांगितले होते. मात्र खटला सुरू होण्यापूर्वीच त्याने हत्येची कबुली दिली. तो अधिकार्‍यांना तिला दफन केलेल्या जागी घेऊन गेला. जिथे त्यांना कौरचे शूज, चष्मा आणि कामाच्या नावाची प्लेट एका डब्यात सापडली.

हे ही वाचा:

भारतीय खगोलशास्त्रज्ञ अश्विन शेखर यांच्या नावे ओळखला जाणार ग्रह

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौरा असेल एक दुर्मिळ सन्मान

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ‘त्या’ अपमानित कष्टकऱ्याचे पाय धुतले!

सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध

अपहरणाच्या दिवशी दुपारी सुरक्षा कॅमेऱ्यात तारिकजोतला हातमोजे, केबल आणि हार्डवेअरच्या दुकानात फावडे खरेदी करताना दिसला. तारिकजोत सिंगला आता जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे.

Exit mobile version