29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरदेश दुनियाअमेरिकी वृत्तपत्रांकडून भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांचे कौतुक

अमेरिकी वृत्तपत्रांकडून भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांचे कौतुक

द न्यूयॉर्क टाइम्सने भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे कौतुक केले

Google News Follow

Related

अमेरिकेतील प्रतिष्ठित वर्तमानपत्र द न्यूयॉर्क टाइम्सने भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. भारतात सद्यस्थितीत १४० स्टार्टअप कंपन्या आहेत. त्यामुळे भारत लवकरच चीनशी तगडे आव्हान देईल, असे या लेखात म्हटले आहे.

भारताने जेव्हा सन १९६३मध्ये पहिल्यांदा रॉकेट लाँच केले होते, तेव्हा भारत जगभरातील सर्वांत मागासलेला आणि गरीब देश होता. रॉकेटला सायकलवरून लाँच पॅडपर्यंत नेले गेले होते. मात्र आता भारताने अंतराळ संशोधन कार्यक्रमात बरीच प्रगती साध्य केली आहे. ‘द सरप्रायझिंग स्ट्रायव्हर इन द वर्ल्ड्‌स स्पेस बिझनेस’ या लेखात भारतात अंतराळ संशोधनाशी निगडित १४० परवानाधारक स्टार्टअप्स आहेत, असे म्हटले आहे.

रशियाचा अंतराळ संशोधन कार्यक्रम बंद

अमेरिकेच्या मते, अंतराळ संशोधन कार्यक्रमात लवकरच भारत चीनला आव्हान देईल. रशिया आणि चीनने कमी खर्चात रॉकेट लाँच करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र युक्रेन युद्धामुळे रशियाचा अंतराळ संशोधन कार्यक्रम ठप्प आहे. यामुळे ब्रिटनच्या ‘वनवेब’चेही २३ कोटी अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले. त्यानंतर ‘वनबेव’ इस्रोकडे पाठवले गेले.
१२ कोटी डॉलर जमवले.

हे ही वाचा:

वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेचेही आव्हान संपुष्टात

अजित आगरकर भारताचे नवे राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती प्रमुख

केंद्रीय उत्पादन शुल्कात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कंपन्यांत भारत पेट्रोलियमचा डंका

विश्वासघात करणाऱ्यांनी परवानगीनंतरचं फोटो वापरावेत

द न्यूयॉर्क टाइम्सने अहवालात म्हटले की, सन २०२०मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात सर्व प्रकारच्या खासगी उद्योगांना चालना देण्याचा निर्णय घेतला. भारताने गेल्या वर्षी अंतराळ संशोधनाच्या स्टार्टअपमधील नवीन उद्योगांसाठी १२ कोटी अमेरिकी डॉलर जमवले आहेत. या लेखात हैदराबादस्थित स्काय रूट आणि ध्रूव स्पेसचाही उल्लेख करण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दोन्ही कंपन्या चांगले काम करत असल्याचे नमूद केले आहे. भारताच्या अंतराळ संशोधन प्रकल्पाच्या व्यवसायात या दोन्ही कंपन्यांचा आठ टक्के वाटा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा