भारतीय जवानांचे ‘गलवान’ आणि पॅंगॉन्ग मध्ये घोड्यांवरून पेट्रोलिंग

सोशल मीडियावर गस्त घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

भारतीय जवानांचे ‘गलवान’ आणि पॅंगॉन्ग मध्ये घोड्यांवरून पेट्रोलिंग

भारतीय सैन्याने लडाख मध्ये चीनबरोबर झालेल्या संघर्षानंतर ताबा रेषेवरील आपली गस्त वाढवलेली आहे. भारतीय जवानांनी हि गस्त घालण्यासाठी घोडे आणि खेचरांचा आधार घेतला आहे. हे जवान गस्त घालत असतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला बघायला मिळत आहे. जून २०२० मध्ये भारत आणि चीन देशाच्या जवानांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. म्हणूनच आपले जवान जास्त काळजी घेत आहेत. दुसरीकडे चीनचे परराष्ट्रमंत्री किन गॅंग सध्या जी-२० च्या परिषदेसाठी परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी सध्या दिल्लीत आहेत.

कींन गॅंग यावेळेस म्हणाले कि, शेजारील देश अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून चीन आणि भारताचे मतभेदांपेक्षाही अधिक समान हितसंबंध आहेत. दोन्ही बाजूंनी आपल्या द्विपक्षीय संबंधांकडे संपूर्ण जगात शतकांमध्ये होत असलेल्या बदलांच्या दृष्टिकोनातून पाहावे. तसेच आधुनिकीकरणाच्या मार्गासाठी दोन्ही देशाने पुढे जायला हवे. असेही पुढे त्यांनी म्हंटले आहे.

हे ही वाचा :

ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा

स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर

हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!

जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू

भारतीय लष्कर हे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन्ही सीमेवर नेहमी उध्दभवणारे संभाव्य धोके आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले. पुढे ते असेही म्हणाले कि, भारतीय लष्कर देशाच्या लोकशाही परंपरा जपत भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. असेही पुढे ते म्हणाले. आमची सतत त्यांच्यावर नजर आहेच त्यांच्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवत असून ,राष्ट्राच्या रक्षण करण्यासाठी सर्व हिताच्या उपाययोजना आम्ही करत आहोत. शिवाय आवश्यकता भासल्यास आम्ही योग्य ती पाऊले उचलणार आहोत.

 

Exit mobile version