नुकतंच भारत आणि चीन आमनेसामने आले होते. तर अनेक महिन्यांपासून भारताने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. यादरम्यान, लोकल सर्कलद्वारे देशातील ३१९ भागांत सर्वेक्षण करण्यात आले आहे. भारतीयांनी चीनच्या वस्तूंकडे पाठ फिरवली आहे, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.
देशातील ३१९ भागामध्ये चिनी वस्तू किंवा चिनी अँपबाबत सर्वेक्षण झाले होते. ज्यामध्ये ४० हजार लोकांनी भाग घेतला होता. लोकांनी सांगितले की, चीनने तयार केलेल्या वस्तू न खरेदी करण्याचे अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण सीमा वाद आणि त्यानंतर त्या वस्तूंचा निकृष्ट दर्जा आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात चिनी अँप्सचा वापरही बंद केला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांमध्ये तीन पैकी एक भारतीय अद्यापही चिनी अँप्सचा वापर करत आहे.
अनेक कारणांमुळे भारतीय लोकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. सर्वेक्षणातील ५८ टक्के लोकांनी निकृष्ट दर्जामुळे आणि सीमा वादामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. तर २६ टक्के लोक हे चिनी वस्तू कधी खरेदी करतचं नाहीत.
तर ५९ टक्के लोकांच्या फोनमध्ये एकही चिनच्या कंपनीचे अँप नाही. तर २९ टक्के लोक एका चीनच्या अँपचा वापर करतात. केवळ चार टक्के लोकं हे एकापेक्षा जास्त चिनी अँप्सचा वापर करतात, अशी माहितीही सर्वेक्षणातून समोर आली आहे.
हे ही वाचा :
‘काम करणाऱ्यांची चर्चा, बिनकाम्यांचे मोर्चे’
२०२३ च कालनिर्णय घेतलात का ? मग ही बातमी तुमच्या साठी
चक्क एलोन मस्क तोट्यात, ते ही इतके डॉलर?
दरम्यान, जून २०२० मध्ये भारताने टिकटॉकसोबत ५९ अँप्सवर बंदी घातली होती. तसेच सप्टेंबर २०२० मध्ये सरकारने ११८ अँप्सवर बंदी घातली होती. यामध्ये गेमिंग अँप पबजीचाही समावेश होता. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी २०२२ मध्ये ५४ चिनी अँप्सवर बंदी घालण्यात आली होती. सरकारच्या मते, या अँप्समधून वापरकर्त्यांच्या डेटा चोरला जाऊ शकतो, म्हणून या अँप्सवर बंदी घालण्यात आली.