कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या

हत्येचे कारण अस्पष्ट; चार संशयित ताब्यात

कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या

कॅनडामध्ये पुन्हा एकदा भारतीय तरुणाची हत्या झाल्याची माहिती समोर आहे. भारतीय नागरिकांची परदेशात हत्या होत असल्याच्या घटना वाढत असून आता हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. पंजाबमधील लुधियाना येथील भारतीय वंशाच्या व्यक्तीची शुक्रवारी कॅनडातील सरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. युवराज गोयल असे त्याचे नाव होते.

पीडित युवराज गोयल २०१९ मध्ये स्टुडंट व्हिसावर कॅनडामध्ये आला होता. तो नुकताच कॅनडाचा कायमस्वरुपी रहिवासी झाला होता. त्याला नुकतंच कॅनेडियन परमनंट रेसिडेंट (PR) दर्जा मिळाला होता. पंजाबमधील लुधियाना येथील भारतीय वंशाच्या युवाराज याची शुक्रवारी कॅनडातील सरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. २८ वर्षीय युवराज सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. त्याचे वडील राजेश गोयल व्यवसाय करतात, तर आई शकुन गोयल गृहिणी आहेत.

रॉयल कॅनेडियन पोलिसांनी सांगितले की , युवराजचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि त्याच्या हत्येमागचा हेतू तपासला जात आहे. ही घटना ७ जून रोजी सकाळी ८.४६ वाजता घडली. ब्रिटीश कोलंबिया येथील १६४ स्ट्रीटच्या ९००-ब्लॉकमध्ये गोळीबार झाल्याचा कॉल सरे पोलिसांना आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना युवराज मृतावस्थेत आढळला.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची जगभरात चर्चा!

इस्रायलच्या युद्धनियोजन मंत्र्यांचा राजीनामा

भारताच्या गोलंदाजांची जादू चालली; शेवटच्या दोन षटकांत फिरला सामना

जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला; नऊ जणांचा मृत्यू

याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. मनवीर बसराम (वय २३ वर्षे), साहिब बसरा (वय २० वर्षे), सरे येथील हरकिरत झुट्टी (वय २३ वर्षे) आणि ओंटारियो येथील केलॉन फ्रँकोइस (वय २० वर्षे) यांच्यावर शनिवारी हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात युवराजवर गोळीबार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, त्याची हत्या का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.

Exit mobile version