अमेरिकेतील टेक्सास मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात ज्या ९ जणांची हत्या झाली त्यात एका २७ वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश होता. हैदराबादमधील सरूरनगर येथील या महिलेचे नाव ऐश्वर्या थाटीकोंडा असून ती दोन वर्षांपासून ‘परफेक्ट जनरल कॉन्ट्रॅक्टर्स’ कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. तिचे वडील नरसिरेड्डी हे जिल्हा न्यायालयात न्यायाधीश आहेत.
गोळीबाराची घटना गेल्या आठवड्यात शनिवारी घडली. शनिवार असल्याने मॉलमधील दुकानांमध्ये गर्दी होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास मॉरिसियो गार्सिया या ३३ वर्षीय बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी ऐश्वर्या तिथे खरेदी करत होत्या. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून या बंदुकधारी व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली. मात्र तोपर्यंत त्याने नऊ जणांचा बळी घेतला होता. तिचा भारतीय पुरुष मित्रही जखमी झाला होता.
हे ही वाचा:
धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!
लोकलमध्ये फुकटची थंड हवा घेणारे प्रवासी वाढले
आफताबवर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप निश्चित; श्रद्धा वालकर हत्या
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक
तिच्यावर मॅककिनी मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. ऐश्वर्या मूळच्या हैदराबादच्या रहिवासी असून सध्या टेक्सासमधील मॅककिनी येथे त्यांचे वास्तव्य होते. शनिवारी घडलेल्या घटनेपूर्वी ऐश्वर्या तिच्या कुटुंबीयांशी बोलली होती. गोळीबाराची माहिती मिळाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. न्यायाधीशांच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, रविवारी कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांना या घटनेचा मोठे धक्का बसला आहे. बुधवारपर्यंत तिचा मृतदेह पाठवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.