न्यूज डंका एक्सक्लुझिव्ह
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या पूजा जसरानी यांची निवड नासाच्या फ्लाईट डायरेक्टर पदावर झाली आहे. या पदावर निवड झालेल्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला ठरल्या आहेत, तर नासाच्या ६२ वर्षांतील कारकीर्दीतील १०१व्या फ्लाईट डायरेक्टर ठरल्या आहेत. आजवर नासामध्ये केवळ १५ महिला फ्लाईट डारेक्टर झाल्या होत्या आणि पूजा जसरानी यांचे नाव देखील या नामावलीत जोडले जाणार आहे.
पूजा जसरानी या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म अमेरिकेतच झाला होता. त्यांनी ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास येथून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी नासामधील त्यांच्या कारकीर्दीला सुरूवात केली. आता नासाच्या १०१व्या फ्लाईट डायरेक्टर म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. नासामध्ये १९५८मध्ये पहिल्यांदा फ्लाईट डायरेक्टर या पदाची निर्मिती झाल्यानंतर आत्तापर्यंत १०० फ्लाईट डायरेक्टर होऊन गेले आहेत. जसरानी ह्युस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटर येथून काम करणार असल्या तरी त्यासोबतच नासाच्या विविध संस्थांशी ताळमेळ साधण्याचे काम देखील त्या पाहणार आहेत.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री
ठाकरे सरकारमधील अनलॉक विसंवादाचा दुसरा अंक आज?
पॅरिसमध्ये विमानात स्फोटकं सापडल्याने खळबळ
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट
अवकाश मोहिमांमध्ये फ्लाईट डायरेक्टरचे कार्य अतिशय जबाबदारीपूर्ण असते. त्या विशिष्ट मोहिमेच्या यशापयशाची जबाबदारी या पदावरील व्यक्तीच्या निर्णयांवर अवलंबून असते. त्यामुळे या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्ती देखील त्याच पात्रतेची असते. पूजा जसरानी यांच्या नियुक्तीने समस्त भारतवासीयांची मान नक्कीच अभिमानाने उंचावली आहे.