29 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरदेश दुनियादक्षिण आफ्रिकेतील विशेष कार्यक्रमात ‘आयएनएस त्रिशूल’ सहभागी होणार

दक्षिण आफ्रिकेतील विशेष कार्यक्रमात ‘आयएनएस त्रिशूल’ सहभागी होणार

भारतीय नौदलाची आघाडीची युद्धनौका ६ ते ९ जून या कालावधीत डरबनला भेट देणार

Google News Follow

Related

दक्षिण आफ्रिकेतील एका विशेष कार्यक्रमात भारतीय नौदलाची युद्धनौका सहभागी होणार आहे. डरबनजवळील पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्थानकावर वर्णभेदाविरुद्ध संघर्ष सुरू झाल्याच्या घटनेला १३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात भारतीय नौदल सहभागी होणार आहे.

‘आयएनएस त्रिशूल’ ही भारतीय नौदलाची आघाडीची युद्धनौका ६ ते ९ जून या कालावधीत डरबनला भेट देणार आहे. ७ जून १८९३ रोजी पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्थानक येथील घटनेच्या १३० व्या स्मरण दिनानिमित्त तसेच दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या पुनर्स्थापनेला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ ‘आयएनएस त्रिशूल’ डरबनला भेट देत आहे.

डरबनच्या भेटीदरम्यान ‘आयएनएस त्रिशूल’ ही नौका पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्थानकावर एका विशेष कार्यक्रमात भाग घेईल तसेच नौकेवरील अधिकारी महात्मा गांधी यांच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पण करतील. यावेळी भारतीय नौदलाचा बॅन्ड खास धून सादर करेल. या भेटीदरम्यान ही नौका इतर व्यावसायिक आणि सामाजिक कार्यातही सहभागी होणार आहे.

पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्थानकावर काय घडले होते?

महात्मा गांधी १८९३ साली व्यापारी दादा अब्दुल्ला यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे दाखल झाले होते. ट्रान्सवालमधील प्रिटोरियाच्या प्रवासादरम्यान ७ जून १८९३ रोजी ते प्रथम पीटरमॅरिट्झबर्ग स्थानकावर आले होते. रितसर तिकीट खरेदी करून प्रथम श्रेणीच्या डब्यात बसलेल्या गांधीजींना एका युरोपियन माणसाच्या तक्रारीवरून त्या डब्यातून बाहेर काढण्यात आले. कारण युरोपियन लोकांच्या म्हणण्यानुसार प्रथम श्रेणीच्या डब्यात ‘कुली’ आणि अश्वेत लोकांना प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. हीच घटना गांधीजींच्या वांशिक भेदाविरुद्धच्या लढ्याला आणि पर्यायाने सत्याग्रहाला कारणीभूत ठरली असे मानले जाते.

हे ही वाचा:

वसतीगृहात तरुणीचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

मृतदेहांतून हात बाहेर आला आणि बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पाय पकडला!

अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रात मोदी दुसऱ्यांदा संबोधित करणार

वसतीगृहात तरुणीचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

२५ एप्रिल १९९७ रोजी पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्थानकावरील महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या प्रेरक कथेला आणखी एक जीवन प्राप्त झाले, जेव्हा दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या अध्यक्षतेखाली पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्थानकावर एका समारंभात, पीटरमॅरिट्झबर्गचे स्वातंत्र्य गांधींजीना मरणोत्तर समर्पित करण्यात आले.

राष्ट्रपती मंडेला यांनी ‘दडपशाहीचा सामना करताना वैयक्तिक त्याग आणि समर्पणाचे महात्मा गांधी हे उत्कृष्ट उदाहरण आहेत’, असे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी एकत्र जमलेल्यांना संबोधित करताना सांगितले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा