भारतीय नौदलाने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे करत पाकिस्तानी मच्छिमाराला जीवनदान दिले आहे. भारतीय नौदलाने, अरबी समुद्रातील संकटाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, २० पाकिस्तानी क्रू सदस्यांना घेऊन जाणाऱ्या इराणी मासेमारी जहाजाला तातडीची वैद्यकीय मदत पुरवली आहे. यातील एक क्रू मेंबर जवळजवळ बुडाला होता. भारतीय नौदलाच्या मदतीमुळे त्याला जीवनदान मिळाले आहे.
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात एका ईमर्जन्सी कॉलला प्रतिसाद देत २० पाकिस्तानी क्रू मेंबर्स असलेल्या मच्छिमारांच्या जहाजाला तात्काळ वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम केले आहे. नौदलाने शनिवारी एक निवेदन जारी करत याबद्दल माहिती दिली आहे. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, एका ईमर्जन्सी कॉलला प्रतिसाद देताना अरबी समुद्रात समुद्री चाच्यांना रोखण्यासाठी तैनात असलेली आयएनएस सुमेधा मिशनने एका इराणी जहाजाला वैद्यकीय मदत पुरवली. या जहाजामध्ये २० पाकिस्तानी क्रू मेंबर्स देखील होते. नौदलाने सांगितलं की पॅट्रोलिंग शिप आयएनएस सुमेधाने ही मदत ३० एप्रिल रोजी केली. सूचना मिलाल्यानंतर लगेच एफवी अल रहमानीला थांबवण्यात आले, तसेच आमची मेडिकल टीम या इराणी जहाजावर पोहचली आणि चालक दलामधील एका सदस्याला तात्काळ उपचार देण्यात आले. त्याला श्वास घेण्यात अडचण येत होती. काही वेळानंतर त्याला शुद्ध आली.
In a swift response to a distress call, INS Sumedha, mission deployed for anti-piracy operations in the Arabian Sea provided critical medical assistance to an Iranian FV (with 20 Pakistani crew), for a near-drowning case of one of its crew members: Indian Navy pic.twitter.com/ImnbSFpV6v
— ANI (@ANI) May 4, 2024
“भारतीय नौदलाच्या मिशनसाठी तैनात केलेल्या तुकड्यांनी केलेले अथक प्रयत्न हे या प्रदेशात कार्यरत असलेल्या नाविकांचे रक्षण आणि सहाय्य करण्यासाठीच्या त्यांच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे,” असे निवेदनात म्हटले आहे. समुद्री चाचे असोत की मडिकल इमर्जन्सी भारतीय नौदल समुद्रात मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचं पाहायला मिळतं.
हे ही वाचा:
पाकिस्तानी नेत्यांना पुन्हा एकदा राहुल गांधींचा पुळका; राहुल हे नेहरूंसारखे समाजवादी असल्याची पोस्ट
कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंना धक्का; उपजिल्हाप्रमुखांसह माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश
केंद्र सरकारचा कांदा उत्पादकांना दिलासा; निर्यातीवरील बंदी हटवली
ओडिशा: पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने सोडले मैदान, पक्षाकडे तिकीट केले परत!
मार्चमध्ये, भारतीय नौदलाने सोमालियाजवळ सशस्त्र चाच्यांनी अपहरण केलेल्या इराणी मासेमारी जहाजाच्या २३ सदस्यांच्या क्रूची यशस्वीरित्या सुटका केली होती. अल-कंबर ७८६ हे जहाज २८ मार्च रोजी अरबी समुद्रात येमेनच्या सोकोत्रा शहराच्या नैऋत्येस नऊ चाच्यांनी ताब्यात घेतले होते. यावेळी आयएनएस सुमेधा आणि आयएनएस त्रिशूल यांनी १२ तासांहून अधिक काळ संघर्ष करून समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पडले. शिवाय पकडलेल्या समुद्री चाच्यांना चाचेगिरी विरुद्ध देशांतर्गत कायद्यांतर्गत आरोपांचा सामना करण्यासाठी भारतात आणण्यात आले. दरम्यान, मासेमारी जहाजावरील २३ पाकिस्तानी नागरिकांच्या क्रूची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यांची मासेमारीची कामे पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना सुरक्षित घोषित करण्यात आले.