भारतीय नौदलाचा पुन्हा चाच्यांशी संघर्ष; अपहृत जहाजावरील २३ पाक कर्मचाऱ्यांची सुटका

भारतीय नौदलाचा पुन्हा चाच्यांशी संघर्ष; अपहृत जहाजावरील २३ पाक कर्मचाऱ्यांची सुटका

येमेनच्या दक्षिणेला भारतीय युद्धनौकांचा समुद्री चाच्यांशी पुन्हा सामना झाला आहे. नऊ सशस्त्र चाच्यांनी इराणच्या अल कम्बर ७८६ या मश्चिमार नौकेचे अपहरण केले. त्याची माहिती मिळताच समुद्री गस्तीवरील दोन युद्धनौका तिकडे वळल्या. त्यांनी या जहाजावरील २३ पाकिस्तानी कर्मचाऱ्यांची सुटका केली. ही घटना सोकोर्टा बेटाच्या दक्षिणेला ९० सागरी मैलावर घडली.

नौदलाला २८ मार्च रोजी रात्री ‘अल कंबर ७८६’ या इराणी मच्छिमार नौकेचे समुद्री चाच्यांनी अपहरण केल्याची माहिती समजली. त्यानंतर नौदलाने तातडीने दोन युद्धनौका तिथे वळवल्या. ‘सोकोर्टा बेटाच्या दक्षिणेला ९० सागरी मैलावर ही घटना घडली. नऊ सशस्त्र चाच्यांनी त्यांचे अपहरण केल्याचे वृत्त आले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या नौकेची सुटका करण्याचा प्रयत्न नौदलाकडून सुरू होता,’ असे नौदलाने निवेदनात नमूद केले आहे.

हे ही वाचा:

बेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर

“मविआमधून आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला”

डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार

गेल्या काही महिन्यांत आदेनच्या खाडीत मालवाहू नौकांवरील हल्ल्यांत वाढ झाल्याने भारतीय नौदलाने येथील सतर्कतेमध्ये वाढ केली आहे. ५ जानेवारी रोजी भारतीय नौदलाने लिबरेनचा झेंडा असलेल्या नौकेची सोमालिया सागरी किनाऱ्यावरून सुटका केली होती. समुद्री चाच्यांनी या जहाजाचे अपहरण केले होते. हिंदी महासागरात सुरक्षित आणि निर्धोक प्रवास व्हावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी उपाय करू, अशी ग्वाही नौदल प्रमुख आर. हरिकुमार यांनी २३ मार्च रोजी दिली होती.

Exit mobile version