भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकेची एमएच-६०आर हेलिकॉप्टर्स दाखल

भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकेची एमएच-६०आर हेलिकॉप्टर्स दाखल

भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात एमएच-६०आर या हेलिकॉप्टर्सचा समावेश झाला आहे. अमेरिकेकडून ही हेलिकॉप्टर्स भारताला मिळाली आहेत. ही हेलिकॉप्टर्स बहुकार्यप्रवण प्रकारची आहेत. शनिवार, १७ जुलै रोजी या हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारताला मिळाली. या पहिल्या तुकडीत एकूण दोन हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे.

अमेरिकेच्या नौदलाकडून सॅन दिएगो येथे नॉर्थ आयलंडवरील नौदलाच्या तळावर भारताने समारंभपूर्वक ही हेलिकॉप्टर्सचा स्विकार केला आहे. या समारंभाद्वारे या हेलिकॉप्टरचे अमेरिकी नौदलाकडून भारतीय नौदलाकडे अधिकृत हस्तांतरण झाले. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी भारतीय नौदलाच्या वतीने ही हेलिकॉप्टर्स स्विकारली आहेत. या समारंभात अमेरिकी नौदलाच्या हवाई दलाचे कमांडर वाईस ऍडमिरल केनेथ व्हिटसेल यांनी या हेलिकॉप्टरची कागदपत्रे भारतीय नौदलाचे उपनौदलप्रमुख वाईस ऍडमिरल रवनीत सिंग यांच्याकडे सुपूर्द केली.

हे ही वाचा:

…पुरावा द्या, नाहीतर ५० कोटींचा दावा ठोकतो!

विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा

टाळेबंदीमध्ये वाढले मुलींमध्ये बालविवाहाचे प्रमाण

घरे पडल्याची बातमी कळताच मंगल प्रभात लोढा धावले

काय आहे या हेलिकॉप्टर्सचे वैशिष्ट्य?
लॉकहीड मार्टीन या अमेरिकी कंपनीने एमएच-६०आर या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन केले आहे. सर्व प्रकारच्या हवामानात विविध प्रकारच्या मोहिमांमध्ये काम करण्याच्या उद्देशाने अद्ययावत अशा सर्व सोयी या हेलिकॉप्टर्समध्ये करण्यात आल्या आहेत. यासाठी अत्याधुनिक एवियॉनिक्स/सेन्सर्सचा वापर करून त्यांची रचना करण्यात आली आहे.

भारत सरकार अशा २४ हेलिकॉप्टर्सची खरेदी अमेरिकेकडून करत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये विविध प्रकारची भारतीय सामग्री आणि शस्त्रे बसवण्यासाठी सुधारणा देखील करण्यात येणार आहे. एमएच-६०आर या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या शास्त्रसज्जतेत आणखी वाढ झाली आहे. या हेलिकॉप्टरचा त्यांच्या क्षमतेनुसार वापर करता यावा यासाठी भारतीय कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे सध्या अमेरिकेत प्रशिक्षण सुरू आहे.

Exit mobile version