…आणि अमरिंदर सिंगचा झाला ‘फुटबॉल’, काय घडले असे विचित्र?

…आणि अमरिंदर सिंगचा झाला ‘फुटबॉल’, काय घडले असे विचित्र?

तिकडे पंजाबात माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यापासून घडामोडींना वेग आला असला तरी त्याचा फुटबॉलशी काही संबंध असण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण या सगळ्या घडामोडींनी अखेर एक वेगळेच वळण घेतले.

भारतीय फुटबॉल संघाचा गोलरक्षक अमरिंदर सिंग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्यामागील कारण मोठे विचित्र आहे. त्याचे आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर यांच्या नावातील सारखेपणातून मोठा गोंधळ उडाला आहे. हे नामसाधर्म्य नेटकऱ्यांना लक्षातच आलेले नाही. त्यामुळे झाले असे की, या फुटबॉलपटूलाच पंजाबचे मुख्यमंत्री समजून लोक त्यालाच टॅग करू लागले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा हा फुटबॉल गोलरक्षक चांगलाच वैतागला आहे. पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांना टॅग करण्याऐवजी लोक या गोलरक्षक अमरिंदर सिंगला टॅग करत असल्यामुळे शेवटी कंटाळून त्याने ट्विट करत आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, प्रसारमाध्यमांनो, पत्रकारांनो मी भारतीय फुटबॉल संघाचा गोलरक्षक अमरिंदर सिंग आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग मी नव्हे. तेव्हा मला टॅग करणे कृपया थांबवा.

या अमरिंदरचा राजकारणाशी काडीचाही संबंध नाही. पण त्याचे नाव मिळतेजुळते असल्यामुळे लोक त्यालाच टॅग करून आपल्या तीव्र भावना व्यक्त करू लागले आहेत.

हे ही वाचा:

… आता निश्चितच काँग्रेसमध्ये राहणार नाही

भारतीय महिलांची ‘ऐतिहासिक कसोटी’

अमरिंदर सिंग-अजित डोवाल भेटीत नेमके काय घडले?

बंगालमध्ये मतदान केंद्रावर बॉम्बहल्ला करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक

या दुर्दैवी अमरिंदरची ही अवस्था पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर यांना कळली तेव्हा त्यांनीही ट्विट करून त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तुझ्याप्रती मला सहानुभूती आहे. माझ्या युवा मित्रा. तुझ्या आगामी सामन्यांसाठी तुला खूप शुभेच्छा.

 

Exit mobile version