खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येसंदर्भात कॅनडाने केलेल्या वक्तव्याचा भारताने केला धिक्कार

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले चोख उत्तर

खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येसंदर्भात कॅनडाने केलेल्या वक्तव्याचा भारताने केला धिक्कार

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध आता ताणले गेले आहेत. भारताच्या कॅनडातील राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी भारताचा संबंध जोडणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने जे वक्तव्य केले आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो.

 

 

कॅनडाच्या पंतप्रधानांचा हा दावा संसदेतही चर्चेत आला आणि त्याचा निषेध करण्यात आला. कॅनडाने जो खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येशी भारताचा संबंध जोडला आहे तो मूर्खपणाचा आणि हेतुपुरस्सर केलेला आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानांबाबत जे वक्तव्य केले आहे, तेही आम्ही फेटाळून लावत आहोत.

हे ही वाचा:

महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येप्रकरणी कॅनडातून भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी

रामदेव बाबांकडून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अग्रलेख !

जनमानसातील आत्मविश्वासाचा विकासच … विकसित भारत घडवेल

अशा प्रकारचे आरोप केल्यामुळे खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेक्यांविरोधात जी कृती करतो आहोत, त्यापासून आपण दूर जातो आहोत. अशा दहशतवाद्यांना उलट कॅनडात आसरा देण्यात आला आहे. हे अतिरेकी भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहेत. कॅनडा सरकारकडून या अतिरेक्यांवर कारवाई केली जात नाही, हा मुद्दा अनेक वर्षांपासून भिजत पडला आहे, असे भारताने म्हटले आहे.

 

 

भारताने म्हटले आहे की, कॅनडाच्या राजकीय नेत्यांना सातत्याने या दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. ही बाब अत्यंत चिंतेची आहे. हत्या, मानवी तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यांना कॅनडात जो वरदहस्त देण्यात आला आहे ते नवे नाही. पण अशा कृत्यांचा संबंध भारताशी जोडणे हे योग्य नाही. आम्ही ते फेटाळून लावत आहोत.उलट कॅनडा सरकारने अशा गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई करावी अशी मागणी आम्ही करतो आहोत.

Exit mobile version