भारतीय जवान गाजवणार रशिया! शांघाय सहकार्य संघटनेचा संयुक्त युद्धाभ्यास

भारतीय जवान गाजवणार रशिया! शांघाय सहकार्य संघटनेचा संयुक्त युद्धाभ्यास

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमधील संयुक्त युद्धाभ्यास कार्यक्रम सध्या रशिया येथे होत आहे. रशियात ओरेनबर्ग येथे या संयुक्त युद्धाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत हा युद्धाभ्यास पार पडणार आहे. या युद्धाभ्यासाचा मुख्य उद्देश, शांघाय सहकार्य परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे संबंध अधिक दृढ करणे आणि या राष्ट्रांच्या लष्करी नेतृत्वाची क्षमता वाढवून त्यायोगे, बहुराष्ट्रीय लष्करी अभियान हाताळण्यास त्यांना सक्षम करणे, हा आहे.

भारतीय लष्कराची तुकडी देखील या संयुक्त युद्ध सरावात सहभागी झाली आहे. या तुकडीत २०० जवानांचा समावेश आहे. देशातील सर्व सैन्यदलांचे सैनिक या तुकडीत आहेत. तर भारतीय हवाई दलाचे ३८ कर्मचारीही या शांतता मोहिमेत सहभागी झाले आहेत. आयएल-७६ या प्रकारच्या दोन लढावू विमानांमधून भारतीय जवानांची तुकडी रशियाला पोहोचली आहे. या संयुक्त युद्धाभ्यासात सहभागी होण्यापूर्वी, या तुकडीने दक्षिण-पश्चिम कमांडच्या नेतृत्वाखाली यासाठी प्रशिक्षण आणि तयारी केली होती.

हे ही वाचा:

तब्बल १४ वर्षांनंतर त्याच्या शिक्षेत केली वाढ! काय घडले वाचा…

निवृत्त नौदल सैनिकांना फ्लिपकार्ट मार्फत पुनर्रोजगाराची संधी

…म्हणून एअर इंडिया विकत घेणे टाटांसाठी आहे खास

टेलिकॉम क्षेत्रात आता करता येणार १००% परकीय गुंतवणूक

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमधील लष्करी मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून संयुक्त युद्धाभ्यास कार्यक्रम घेतला जातो. दर दोन वर्षांनी संयुक्त दहशतवाद विरोधी मोहीम राबवण्यासाठी, बहुराष्ट्रीय शांतता युद्धसराव घेतला जातो. यंदा या संयुक्त शांतता अभियानाचे सहावे वर्ष आहे. या संयुक्त युद्धाभ्यास कार्यक्रमात, वैयक्तिक व्यावसायिक चर्चा, संयुक्त मोहिमा आणि पद्धतींचे प्रशिक्षण, संयुक्त कमांडची स्थापना तसेच, दहशतवादाच्या धोक्याचे समूळ उच्चाटन अशा सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

Exit mobile version