भारत सध्या जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवत आहे. भारताची लसीकरण मोहिम भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड या लसींवर आधारित आहे. देशातील लसीकरणाला बळकटी येण्याच्या दृष्टीने भारत सरकारने या दोन्ही कंपन्यांना सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे मंजूर केले आहे.
सिरमचे अध्यक्ष आदर पुनावाला यांनी यापूर्वी भारत सरकारकडे उत्पादन वाढवण्यासाठी अर्थसहाय्य मागितले होते. त्यानंतर आता भारत सरकारने दोन्ही कंपन्यांना सहाय्य करण्याचे घोषित केले आहे.
हे ही वाचा:
ट्वीटरवर गाजला ‘अरेस्ट साकेत गोखले’ ट्रेंड
साकेत गोखले यांच्याविरोधात तक्रार दाखल
दिल्लीत लॉकडाउनआधी तळीरामांची गर्दी
पुन्हा एकदा संकट काळात संघाची मदत
भारत सरकार सिरमला तीन हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देणार आहे, तर भारत बायोटेकला पंधराशे कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे. हे अर्थसहाय्य दोन्ही कंपन्यांचे लस उत्पादन वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे.
हे पैसे आधी अर्थमंत्रालयाकडून कोविड-१९साठी जबाबदार असलेल्या नोडल मंत्र्याकडे दिले जाणार आहेत. त्यानंतर ते या दोन कंपन्यांकडे दिले जाणार आहेत.
सुमारे १० कोटी लोकांना ८५ दिवसांत सर्वात वेगाने लस भारत देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या सोबतच भारत सरकारने रशियाच्या स्पुतनिक-५ या लसीला देखील परवानगी दिली आहे. त्याशिवाय भारताने अजून चार लसींना भारतातील ट्रायल शिवाय लसीकरण करण्यास परवानगी देण्याचे धोरण स्विकारले आहे.