पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकविरोधी निदर्शनात फडकला तिरंगा

पाकिस्तानी लष्कर, पोलिसांविरोधात निदर्शने सुरू; ध्वज फडकवल्याचा फोटो व्हायरल

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकविरोधी निदर्शनात फडकला तिरंगा

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा सध्या अस्थिर भाग असून या भागात सातत्याने पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांविरोधात निदर्शने सुरू असतात. जम्मू काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये शटर डाऊन आणि व्हील-जॅम स्ट्राईक करणार असल्याचे जाहीर केले होते. या निदर्शनादरम्यान भारताचा ध्वज फडकवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांविरोधात जोरदार निदर्शनं सुरू आहेत. या निदर्शनेदरम्यान मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी या गर्दीत भारतीय ध्वज फडकवण्यात आल्याचे समोर आले आहे. अन्यायकारक करांवर पाकिस्तान सरकारच्या विरोधात पीओकेमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहे आणि पाकिस्तानने रॉवर याचे आरोप केले आहेत. यावेळी आंदोलकांनी सुरक्षा जवानांवरही दगडफेक केली.

जम्मू काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी ११ मे रोजी पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सीएएफ आणि पंजाब पोलिसांच्या अतिरिक्त तुकडीची मागणी केली आहे. राज्यांनी बाहेरून सैन्य तैनात करून परिस्थितीला सामोरे जाण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले आहेत. ११ मेच्या घटना हाणून पाडण्याचा सरकारचा कोणताही प्रयत्न बळजबरीने झाल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, असा निर्धार संयुक्त अवामी कृती समितीच्या नेत्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

२५ गोळ्या मारून पाकिस्तनाचे ड्रोन बीएसएफने पळवून लावले!

लव्ह जिहादचे प्रकरण; हिंदू असल्याची बतावणी करून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

खळबळजनक! आई, पत्नी, मुलांची हत्या करून आरोपीची गोळ्या झाडून आत्महत्या

‘नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरलेले २० किलो आयडी जागीच निष्प्रभ’

पीओकेच्या लोकांचे म्हणणे आहे की पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानमधील लोकांना अन्न, पीठ आणि डाळ अशा मुलभूत गोष्टीही मिळत नाहीत. वीज कपात सुरू आहे. सर्वत्र भुकेने लोक मरत आहेत. पाकव्याप्त काश्मीरच्या युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी आणि जम्मू काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने शांततापूर्ण निदर्शकांवर कोणत्याही शक्तीचा वापर न करण्याचा इशारा पाकिस्तानला दिला आहे. पण, पीओकेच्या अनेक भागांमध्ये निदर्शनांनी आता हिंसाचाराचे रूप धारण केले आहे.

Exit mobile version