अमेरिकेच्या संघात भारतीय खेळाडू

संघात भारतीय महिलांची आहे.

अमेरिकेच्या संघात भारतीय खेळाडू

भारतीयांना असलेली क्रिकेटची हौस ही जगजाहीर आहे. पण आता युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेनेसुद्धा क्रिकेटमध्ये एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी २०२३ साठी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण यूएसए संघामध्ये भारतीय महिला खेळाडू आहेत.

या संघामध्ये अर्ध्याहून अधिक खेळाडू हे तेलगु आहेत. गीतिका कोडाली संघाची कर्णधार असून अनिका रेड्डी कोलनची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तेलगू वंशाच्या भूमिका भद्रिराजू, लास्या प्रिया मुल्लापुडी, सई तन्मयी इयुन्नी हे खेळाडू आहेत. दरम्यान, कस्तुरी वेदांतमला पाच राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे.

‘अमेरिकेच्या संघात भारतीय खेळाडू’ अशा प्रकारची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे. यूएसए क्रिकेट संघ की भारत ब संघ?, यूएसए महिला क्रिकेट संघ हे भारतीय महिला क्रिकेटचे प्रतिनिधित्व आहे असे वाटते, अशा प्रकारचे ट्विटरवर ट्विट करण्यात आले आहे. या यूएसए संघासाठी एक भारतीय वंशाची प्रशिक्षक निवडण्यात आली आहे. ही प्रशिक्षक वेस्ट इंडीज संघाची माजी कर्णधार शिवनरीन चंद्रपॉल आहे. आयसीसीचे सामने जानेवारी २०२३ रोजी सुरू होईल आणि २९ जानेवारीला अंतिम सामने होणार आहे.

हे ही वाचा : 

नेमाडपंथी पुरोगामी अज्ञानपीठ

उद्या मुंबईमध्ये भाजपाचा ‘माफी मांगो’ मोर्चा

ठाकरे गटाला नाशिकमध्ये खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात

अखेर कोळी बांधवांची मागणी मुख्यमंत्र्यांनीचं पूर्ण केली

गीतिकाने वयाच्या ११ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वयाच्या १५ व्या वर्षी ती कॅलिफोर्नियातील क्रिकेट झील अकादमीमध्ये क्रिकेट शिकत होती. तिने सॅन रेमन क्रिकेट असोसिएशन आणि ट्रँगल क्रिकेट लीगचे प्रतिनिधित्व केले आहे.

उपकर्णधार अनिकाला ती नऊ वर्षांची असताना खेळाबद्दल असलेली आवड तिने जोपासली आहे. तिच्या करियरमध्ये तिचे वडील आणि भावाने यांनी मोठी भूमिका बजावली आहे. तिने कर्नाटक इन्स्टिटयूट ऑफ क्रिकेट मध्ये पहिल्यांदा अर्धशतक केलं होता. दरम्यान, संपूर्ण संघामध्ये भारतीय महिला वंशाचे खेळाडू असणं ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.

Exit mobile version