26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाभारताच्या स्वदेशी पाणबुडीमुळे उडाली चीनची झोप

भारताच्या स्वदेशी पाणबुडीमुळे उडाली चीनची झोप

भारताची ताकद आणखी वाढणार

Google News Follow

Related

लष्करी सामर्थ्य वाढवून चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत आता कंबर कसून तयार आहे. या क्रमवारीत, पाचवी कलावरी वर्ग पाणबुडी आय एन एस  ‘वागीर ‘ आता भारतीय नौदलात सामील होणार आहे. २३ जानेवारी रोजी एका कार्यक्रमात ही पाणबुडी नौदलात सामील होणार आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही पाणबुडी मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये तयार करण्यात आली आहे. ही स्वदेशी बनावटीची पाचवी कलावरी वर्ग पाणबुडी आहे. यापूर्वी अशा चार पाणबुड्या भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत.

भारत देश स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड

आय एन एस ‘वागीर’ पाणबुडी हि नौदल आणि देशाच्या सर्व गरजा पूर्ण करेल.कमांडिंग ऑफिसर कमांडर दिवाकर एस,यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत बनण्याच्या दिशेने हा एक मैलाचा दगड ठरत आहे.या वर्गाच्या पाणबुड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. तसेच, त्याची देखभाल भारतीय नौदलाकडून केली जाते. त्याच्या बहुतेक चाचण्या या नौदल आणि ऍडमिरल या दोघांनी संयुक्तपणे केल्या आहेत.

वागीरचा इतिहास

आय एन एस ‘वागीर’  एक नोव्हेंबर १९७३ रोजी कार्यान्वित करण्यात आला. जवळपास ३० वर्षे त्यांनी पाळत ठेवण्यासह अनेक मोहिमा यशस्वी राबवल्या. सात जानेवारी २००१ रोजी  पाणबुडी बंद करण्यात आली.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

नवीन अवतार लाँच

स्वदेशी पाणबुडी  ‘आय एन एस  वागीरचा’ नवीन अवतार बारा नोव्हेंबर २०२० रोजी लाँच करण्यात आला होता. आतापर्यंत बांधलेल्या पाणबुड्यांपैकी कमीत कमी वेळात बांधल्या जाण्याचा मान या पाणबुडीला मिळाला आहे. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी या पाणबुडीने आपला पहिला प्रवास पूर्ण केला आणि कठोर तपासण्या आणि आव्हाने पार केली. ॲडमिरल २० डिसेंबर २०२२ रोजी ही पाणबुडी भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली.

ही पाणबुडी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये तयार करण्यात आली आहे. ही स्वदेशी बनावटीची पाचवी कलावरी वर्ग पाणबुडी आहे. यापूर्वी  अशा चार पाणबुड्या भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा