टोकियो ऑलिम्पिकनंतर आणखीन एक क्रीडा स्पर्धा गाजवायला भारत सज्ज

टोकियो ऑलिम्पिकनंतर आणखीन एक क्रीडा स्पर्धा गाजवायला भारत सज्ज

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये आजवरचे सर्वोत्तम प्रदर्शन केल्यानंतर आता आणखीन एका क्रीडा स्पर्धेत भारत सहभागी होत आहे. या स्पर्धेत देखील भारताचे खेळाडू हे उत्तम प्रकारचे सादरीकरण करून देशाची मान अभिमानाने उंचावण्यासाठी सज्ज आहेत.

रशिया येथे आंतरराष्ट्रीय सैन्य क्रीडा स्पर्धा खेळवली जाणार आहे. २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय लष्कराचे पथक सहभागी होणार आहे. १०१ सदस्यांचे हे पथक असणार आहे. हे पथक आर्मी स्काउट मास्टर्स स्पर्धा (एएसएमसी), एलब्रस रिंग, पोलर स्टार, स्निपर फ्रंटियर आणि सेफ रूट या खेळांमध्ये सहभाग नोंदवतील. उंचावरील प्रदेशात विविध कवायती, बर्फातील खेळ, स्निपर क्रिया, विविध स्पर्धांमध्ये अडथळा असलेल्या प्रदेशात लढाऊ अभियांत्रिकी कौशल्ये हे खेळाडू दाखवतील.

हे ही वाचा:

ऑगस्ट क्रांतिदिनी काँग्रेस नेत्याच्या फेसबुकवर ‘कांती’च्या मशाली

शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र

चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?

१५ ऑगस्टचे ध्वजारोहण रोखा आणि दहा लाख डॉलर कमवा

हे पथक ओपन वॉटर आणि फाल्कन हंटिंग गेम्ससाठी दोन निरीक्षक (प्रत्येकी एक) देखील पाठवणार आहे , ज्यात सहभागी संघ पोंटून ब्रिज लेईन्ग आणि यूएव्ही क्रू कौशल्य दाखवतील. भारतीय लष्कराच्या पथकाची निवड करताना त्रिस्तरीय चाचणीनंतर विविध विभागांमधून सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे हे भारतीय सैन्याच्या व्यावसायिकतेचे प्रतिबिंब आहे.

या स्पर्धेमुळे सहभागी राष्ट्रांच्या सर्वोत्तम पद्धतींच्या आधारे लष्करी सहकार्य देखील वृद्धिंगत होईल. या आधी जैसलमेर येथे झालेल्या आर्मी स्काऊट्स मास्टर स्पर्धा २०१९ मध्ये सहभागी झालेल्या आठ देशांमध्ये भारताने अव्वल स्थान प्राप्त केले होते.

Exit mobile version