काँगोमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सहाय्यास धावली भारतीय सेना

काँगोमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सहाय्यास धावली भारतीय सेना

काँगोमध्ये न्यारागाँगो या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर गोमा या शहरातील लोकांना शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यासाठी भारतीय सैन्य तैनात करण्यात आले आहे.

भारतीय सैन्य संयुक्त राष्ट्रांच्या मोनुस्को (MONUSCO) कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात आधीपासूनच काँगोमध्ये तैनात करण्यात आले आहे. र्वांडा सीमेवरील गोमा शहरात संयुक्त राष्ट्रांच्या मोनुस्को शांतीसेनेचे मुख्यालय आहे.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकारचा पॅकेज देण्यावर विश्वास नाही, घेण्यावर आहे’

भाजपाकडून पालघरसाठी मदतीची पहिली खेप रवाना

चला कोकणाला देऊ मदतीचा हात; मुंबई भाजपाने दिली हाक

भारतात ऑगस्टपासून दरमहिना तयार होणार ४ कोटी स्पुतनिक डोस

सैन्याच्या अधिकृत माहितीनुसार भारतीय ब्रिगेडचे मुख्यालय गोमा विमानतळाच्या जवळच आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लाव्हा र्वांडाच्या दिशेने वाहत गेला आहे आणि त्यातला छोटासाच भाग गोमाच्या दिशेने वाहत गेला आहे.

सैन्याकडून मिळालेल्या माहितीनुसार खबरदारीचाय उपाय म्हणून अनेक सैनिकी तुकड्यांना सावध राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत सुरक्षा प्रणालीच्या अंदाजानुसार सैनिकी तुकड्यांचे स्थलांतर करण्याची गरज नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून हवाई तुकड्यांचे देखील स्थलांतर करण्यात आले आहे. भारतीय सैन्याने देखील आपल्या चौकीवरील ७० टक्के सैनिकांना मागे सुरक्षित स्थळी हलवले आहे.

सैन्याने दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याने आघाडीवर चौक्या स्थापन केल्या आहेत आणि सैन्याकडून लव्हाच्या प्रवाहाबद्दलची माहिती वेळोवेळी संयुक्त राष्ट्रांकडे पाठवली जात आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांना व्यवस्था राखण्यास सहाय्य होत आहे.

सध्या लाव्हाचे प्रवाहीपण कमी झाले आहे. त्यामुळे हा लाव्हा गोमा शहरापर्यंत पोहोचणे अशक्य वाटते आहे, मात्र जर फटींमधून नव्याने उद्रेक झाला तर मात्र परिस्थितीत फरक पडू शकतो. लाव्हासोबत हलक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के देखील या भागात अनुभवास येत आहे.

Exit mobile version