श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट

श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट

श्रीलंकेचे भारतातील राजदूत मिलिंदा मोरागोडा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आहे. गुरुवार, २४ फेब्रुवारी रोजी मोरागोडा हे रा. स्व. संघाच्या नागपूर येथील महल कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे.

या नागपूर भेटीत मोरागोडा यांनी रेशीमबाग येथेही भेट दिली असून स्मृती मंदिर या डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. डॉक्टर हेडगेवार हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी असून त्यांनी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघाचे आद्य सरसंघचालक म्हणून ते ओळखले जातात.

हे ही वाचा:

‘यशवंत जाधवांवर झालेल्या कारवाईचे स्पष्टीकरण पक्षप्रमुखांनी द्यावे’

आयपीएल २०२२चा रणसंग्राम मुंबई, पुण्यात; या तारखेपासून सुरू होणार सामने

युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत; पंतप्रधान मोदींचा पुतीन यांना सल्ला

मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धडकले आयकर खाते

या भेटी दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत आणि श्रीलंकेचे राजदूत मिलींदा मोरागोडा यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. तर मोरागोडा यांनी संघ कार्यालयाला २ तैलचित्र भेट म्हणून दिली आहेत. अराहत महिंदा आणि संघमित्त थेरूनी यांची ही चित्रे आहेत. मिलिंदा मोरागोडा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून या भेटीची क्षणचित्रे शेअर केली आहेत.

Exit mobile version