27 C
Mumbai
Thursday, November 21, 2024
घरदेश दुनियाराष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने कमावली तीन पदकं

राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने कमावली तीन पदकं

Google News Follow

Related

इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा (कॉमनवेल्थ स्पर्धा २०२२) सुरू असून या स्पर्धेत भारतीय खेळाडू आपली छाप पडत आहेत. भारताचे वेटलिफ्टर चांगलेच फॉर्ममध्ये असून सोमवार, १ ऑगस्ट रोजी वेटलिफ्टिंगमध्ये एक पदक पटकावले आहे तर खेळाडूंनी ज्यूदोमध्ये दोन पदकांना गवसणी घातली आहे. स्पर्धेच्या चौथ्यादिवशी भारताने तीन पदकं खिशात घातली आहेत. त्यामुळे भारताची पदकसंख्या नऊवर गेली आहे.

सुशीला देवी हिने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात ज्यूदोमध्ये रौप्य पदक जिंकलं. तर विजय कुमार याने ६० किलो वजनी गटात कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळत असून भारताने याच खेळात आणखी एक पदक मिळवलं आहे. भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने ७१ किलो वजनी गटात कांस्य पदक कमावले आहे. हरजिंदर कौरनं स्नॅचमध्ये ९३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११९ किलो असं एकूण २१२ किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकलं.

हे ही वाचा:

राष्ट्रकुल स्पर्धेत अचिंता शेउलीला सुवर्णपदक; भारताच्या नावे सहावं पदक

संजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी

कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख

भारताच्या खात्यात आणखी तीन पदकं निश्चित

लॉन बाऊल्समध्ये भारतीय महिला गटाने फायनलमध्ये धडक मारल्याने किमान रौप्यपदक भारताने निश्चित केलं आहे. तर बॅडमिंटन आणि टेबल टेनिस संघानेही फायनलमध्ये प्रवेश केला असून किमान रौप्यपदक निश्चित केलं आहे. या पदकांसह भारताच्या खात्यावर १२ पदकं झाली असून ही तीन पदकं सुवर्ण असतील की रौप्य याकडे लक्ष असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा