सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ने पराभव करून विजेतेपदावर नवव्यांदा नाव कोरले आहे.
अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस दिसत होती. निम्मा खेळ होईपर्यंत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होता. त्यानंतर मात्र सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर गेला. तिथे सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अजोड कामगिरी करत किताब नवव्यांदा भारताच्या नावावर केला. याआधी भारताने १९९३, १९९७, १९९९, २००५, २००९, २०११, २०१५ आणि २०२१ मध्ये हा किताब पटकावला आहे.
या विजयाचा शिल्पकार ठरला तो गोलरक्षक गुरप्रीत संधू. त्याने पेनल्टीचा बचाव करून भारताला चॅम्पियन बनवले. दोन्ही संघाचा गुणतक्ता सामन्याच्या वेळेत आणि नंतर अतिरिक्त वेळेतही १-१ असाच होता. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना खेळवला गेला. तिथे गुरप्रीत अभेद्य भितींसारखा उभा राहिला आणि त्याने भारताला विजयपथावर नेले. जे दोन गोल झाले, ते खेळाच्या पहिल्या अर्ध्या वेळेतच झाले. सुरुवातीपासूनच या सामन्यात कुवेतचे वर्चस्व दिसत होते. १४व्या मिनिटाला कुवेतने आघाडी घेतली. कुवेतच्या वतीने अब्दुल्ला अलबलूशी याने पहिल गोल केला. नंतर लल्लियानजुआला चांगटे याने ३९व्या मिनिटाला कुवेतवर गोल करून बरोबरी साधली.
हे ही वाचा:
अजित पवारांकडून मोदींची तारीफ, विरोधकांवर घणाघात
शरद पवारांच्या राजकारणाची कथा आटोपली काय?
वय झाले, आता थांबा, फक्त आशीर्वाद द्या!
‘मला वाटते, आम्ही खरोखऱच चांगला खेळ केला. एक गोलने पिछाडीवर असूनही पराभव न मानण्याचे श्रेय संघाच्या खेळाडूंना जाते. कोणाचे नशीब चांगले आहे, यावर पेनल्टीमध्ये कोण विजयी ठरेल, यावर अवलंबून असते आणि आज आमचे नशीब चांगले होते,’ अशी प्रतिक्रिया गुरप्रीत संधू याने दिली आहे.