27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरदेश दुनियाबर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला डझनभर पदके

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला डझनभर पदके

Google News Follow

Related

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताने डझनभर पदकांची कमाई केली. ऍथलेटिक्स, बॉक्सिंगमध्ये भारताने पदकांची लयलूट केली. ऍथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत भारताने दोन पदके जिंकली.

बॉक्सिंगमध्ये अमित पंघल, नितू घंघास यांनी सुवर्णपदक विजेती कामगिरी केली. महिलांच्या हॉकी संघाने ब्राँझपदकाची कमाई केली.

तिहेरी उडीत एल्डहोस पॉलने सुवर्णपदक विजेती उडी मारली तर अब्दुल्ला अबुबकरने रौप्यपदक जिंकले. १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार, अन्नू रानी (भालाफेक) यांनीही पदके जिंकली. निखत झरीनने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकाविले तर अचंता शरथ कमाल व सत्यन ज्ञानशेखरन यांनी टेबलटेनिस दुहेरीचे रौप्य जिंकले. स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या आहेत. लक्ष्य सेन तसेच सात्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही आपापल्या प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे.

तिहेरी उडीत एल्डहोस पॉलने १७.०३ मीटर उडी मारत सुवर्णपदक जिंकले. अब्दुल्ला अबुबकर याने १७.०२ मीटर उडी मारत रौप्य पटकाविले.

बॉक्सिंगमध्ये अमित पंघलने इंग्लंडच्या किआरन मॅकडोनाल्डला पराभूत करत ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. नितू गंघासनेही ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. इंग्लंडच्या डेमि जेडला तिने पराभूत केले.

हे ही वाचा:

अबू आझमींना आला औरंगजेबाचा पुळका

आनंद महिंद्र यांनी शेअर केला ‘मैत्र जीवांचे’ व्हीडिओ

युद्धनौका निघाल्या विश्व सफारीवर

१५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार

 

बॉक्सिंगमध्ये निखत झरीनने आपले पहिले राष्ट्रकुल सुवर्णपदक पटकाविले. तिने उत्तर आयर्लंडच्या कार्ली मॅकनॉलला पराभूत केले. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये मात्र भारताला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. द्युती चंद, हिमा दास, सर्बानी नंदा, ज्योती यर्राजी यांना दमदार कामगिरी करता आली नाही.

भालाफेक प्रकारात अन्नू रानीने ६० मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत ब्राँझ जिंकले. विशेष म्हणजे ७ जुलै हा दिवस ज्या दिवशी भारताच्या नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकचे सुवर्ण जिंकले होते. त्यामुळे या दिवसाला भालाफेक दिन म्हणून ऍथलेटिक्स फेडरेशनने नोंद केली आहे. तसे ट्विटही त्यांनी केले. याच दिवशी भारताला भालाफेकमध्ये ब्राँझही मिळाले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा