भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. दहशतवाद कोणत्याही प्रकारचा असो आम्ही त्याचा निषेधच करू अशी भूमिका पंतप्रधानांनी मांडली आहे.
एक्सवर पंतप्रधानांनी इस्रायलला पाठिंबा देत असल्याचा संदेश शेअर केला आहे. मोदींनी त्यात म्हटले आहे की, आपले इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी तेथील परिस्थितीची आपल्याला माहिती दिली. भारतातील जनता ही या संकटकाळात इस्रायलच्या बाजूने आहे. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा कठोर शब्दांत निषेध करतो.
हे ही वाचा:
लेक लाडकी; महाराष्ट्रातल्या ‘नवदुर्गां’ना नवरात्रौत्सवाची भेट
ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया
शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल
महायुती सरकारचा समित्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला
जेव्हा इस्रायलवर हमास य दहशतवादी संघटनेने हल्ला केला तेव्हाही पंतप्रधानांनी या हल्ल्याचा निषेध केला होता. या हल्ल्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे मोदींनी म्हटले होते. या संकटकाळात भारत हा इस्रायलच्या सोबत आहे.
७ ऑक्टोबरला हा संघर्ष सुरू झाला. हमास या दहशतवादी संघटनेने अचानक इस्रायलवर हल्ले केले. जमिनीवरूनही त्यांनी हल्ले केले तसेच जलमार्गेही ते इस्रायलमध्ये शिरले. उत्सवात व्यग्र असलेल्य इस्रायलच्या सर्वसामान्य नागरिकांवर त्यांनी हल्ले करत त्यांचे प्राण घेतले. आतापर्यंत दोन्ही बाजूचे १६०० लोक मारले गेले आहेत. इस्रायलचे ९०० लोक मारले गेले असून २६०० लोक जखमी आहेत तर गाझावर केलेल्या हल्ल्यात ७०४ पॅलेस्टिनी लोक मारले गेले आहेत. त्यात १४३ मुले आणि १०५ महिलांचा समावेश आहे. ४ हजार लोक जखमी आहेत.