श्रीलंकेतल्या उच्चस्तरिय अधिकाऱ्यांनी श्रीलंका हा भारतासाठी पहिली प्राथमिकता असणारा देश आहे. भारत श्रीलंकेला संरक्षण क्षेत्रात कायमच संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
हे ही वाचा:
श्रीलंकेचे हवाई दल २ मार्च रोजी आपला ७०वा वर्धापनदिन साजरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय उच्चाधिकाऱ्यांकडून हे आश्वासन देण्यात आले आहे.
भारतीय हवाई दलाची २३ विमाने या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भारतीय उच्चाधिकाऱ्यांनी या सहभागाला वाढत्या सहकार्य आणि मैत्रीचे प्रतिक म्हटले आहे.
श्रीलंका एअर फोर्सने (एसएलएएफ) प्रथमच फ्लाय पास्ट आणि हवाई कसरतींचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले आहे.
यात काही भारतीय विमाने देखील भाग घेणार आहेत. भारताकडून भाग घेणाऱ्या विमानांमध्ये सुर्य किरण, तेजस लढाऊ विमान, तेजस शैक्षणिक विमान आणि डॉर्निअर गस्ती विमानांचा समावेश असणार आहे.
भारतीय उच्चस्तरिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताकडून सहभागी होणारी सर्व विमाने ही मेड इन इंडिया असणार आहेत. भारतीय संरक्षण क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेचे तसेच या क्षेत्रातील भारताच्या वाढत्या विश्वासार्ह्यतेचे आणि विकासाचे प्रतिक आहेत.
भारताचा प्राचिन काळापासून शेजारी असणाऱ्या श्रीलंकेसोबतचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले आहेत. परंतु अलिकडच्या काळात चीनने श्रीलंकेतील काही बंदरांचा विकास करायला गुंतवणुक करायला सुरूवात केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या विमानांचा सहभाग उल्लेखनीय आहे.