‘विकासवाढीच्या दरात भारत चीनला मागे टाकेल’

इतिहासकार नीआल फर्ग्युसन यांचा दावा

‘विकासवाढीच्या दरात भारत चीनला मागे टाकेल’

‘चीनचा विकासवाडीचा दर हा घसरत चालला असून तो आगामी दशकात एक अंकी होणार आहे. त्यामुळे विकासवाढीच्या दरात भारत चीनला मागे टाकेल,’ असे भाकीत इतिहासकार नीआल फर्ग्युसन यांनी वर्तवले आहे.

‘मला आठवते, २००८नंतर कधीतरी मी भारत-चीनमधील शर्यत ही ससा-कासवांदरम्यानची शर्यत असल्याचे भाकीत वर्तवले होते. तेव्हा चीन हा ससा होता आणि भारत हा कासवाप्रमाणे होता. तेव्हाही मी परिस्थिती पाहून भारत कासव बनून शर्यत जिंकेल, असे भाकीत वर्तवले होते. आणि आता सन २०२४ वर्ष सुरू आहे. सर्वजण चीनमधील आर्थिक मंदीवर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील जादूवर बोलत आहेत. काहीतरी मूलभूत बदल झाला आहे, हे तथ्य कोणीही नाकारू शकत नाही. २० वर्षांपूर्वी मला असा भारत माहीत होता, जो नामशेष होऊ घातला होता. मात्र या भारताचा आता नव्या भारतात बदल झाला आहे, असे फर्ग्युसन यांनी स्पष्ट केले. पायाभूत विकासाच्या मंदीबाबतचे जुने अंदाज मोडून आश्चर्यजनक बदल केल्याबद्दल फर्ग्युसन यांनी भारताचे कौतुक केले.

भारताकडे अनेक सकारात्मक बाबी असल्याने पुढील शतक हे भारताचे असेल, असा दावाही फर्ग्युसन यांनी केला. ‘भारतामध्ये अद्यापही मुक्त समाज आहे. पत्रकारितेला स्वातंत्र्य आहे आणि निवडणुकाही मुक्त वातावरणात होत आहेत. चीनमध्ये असे अजिबातच नाही. चीन हा एकपक्षीय देश आहे. तोही जुन्या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रारूपानुसार चालतो. हेदेखील यामागचे कारण आहे की, मी १०,१२, १५ वर्षांपूर्वी भारताबाबत आशावादी होतो आणि मी आताही आशावादी आहे,’ असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

‘बाबरी मशिद पाडली, तिथेच राम मंदिराची उभारणी’

माजी सैनिकाची अनोखी रामभक्ती; ७ कोटी वेळा लिहिले ‘श्री राम’

विराट कोहलीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिराला दिली भेट

‘आणखी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे फिनटेक ही यंत्रणा. २० वर्षांपूर्वी तुम्हाला काहीही विकत घेण्यासाठी नोटा वापराव्या लागत होत्या. आता मात्र तसे होत नाही. आता भारताने राष्ट्रीय यंत्रणा म्हणून फिनटेकचा वापर केला आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांनाही याबाबत भारताचा हेवा वाटतो. अशा प्रकारचे बदल कोणीही २० वर्षांपूर्वी कल्पिले नसतील,’ असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version