27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरदेश दुनियापाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना ५० हजार फुटांवरून टिपणार

पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना ५० हजार फुटांवरून टिपणार

अमेरिकी कंपनीकडून भारत मानवरहित प्रीडेटर ड्रोन एमक्यू – ९ बी खरेदी करणार

Google News Follow

Related

भारताचे संरक्षण मंत्रालय जनरल ऍटोमिक्स या अमेरिकी कंपनीकडून मानवरहित प्रीडेटर ड्रोन एमक्यू – ९ बी खरेदी करणार आहे. हा जगातील सर्वांत विकसित ड्रोन आहे. हा ड्रोन ५० फूट उंचावरून शस्त्रूंचा नायनाट करू शकतो.

 

सन २०२१मध्ये या एका ड्रोनची किंमत तीन कोटी डॉलर होती. हे ड्रोन दोन प्रकारचे आहेत. एक स्काय गार्डियन आणि दुसरे सी गार्डियन. म्हणजे एक आकाशचा रक्षक तर दुसरा समुद्राचा. सी गार्डियन ड्रोन तिन्ही सशस्त्र दलांसाठी खरेदी केले गेले आहेत. समुद्रावरील देखरेख तसेच, पाणबुडीचा माग काढण्यातही हे ड्रोन महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

नौदलाला १४ तर, हवाई दल आणि लष्कराला प्रत्येकी आठ ड्रोन मिळणार आहेत. ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या मते, या मानवरहित ड्रोनने पहिले उड्डाण फेब्रुवारी २००१मध्ये केले होते. याच्या इंजिनाची क्षमता ९५० शाफ्ट अश्वशक्ती असल्याने ते सर्वाधिक घातक आणि शक्तिशाली आहे. अफगाणिस्तान युद्धादरम्यान सन २००८मध्ये अमेरिकी हवाई दलाने २३० किलो वजनाच्या बॉम्बने शत्रूंची १६ ठिकाणे नामशेष केली होती.

हे ही वाचा:

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरीच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

कांदिवलीच्या शाळेत लावली अजान, एक शिक्षिका निलंबित

आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दिल्ली पोलिस गुन्हे मागे घेणार

मकोका लागलेल्या गँगस्टरशी राऊत बंधूंची सलगी कशी?

या ड्रोनची सहजतेने वाहतूक केली जाते. अवघ्या आठ तासांत हे ड्रोन सहज पॅक करण्याचा विक्रम अमेरिकेच्या नावावर आहे. या ड्रोनमध्ये थर्मोग्रॅफिक कॅमेरे आणि सेन्सरही आहेत. ड्रोनमधील कॅमेऱ्याने तीन किमी दूर असलेल्या गाडीचा नंबरही वाचता येऊ शकतो. आपत्कालीन परिस्थितीत एका इशाऱ्यासरशी १.२ सेकंदात तो इतक्या लांबवरचे लक्ष्य भेदू शकतो. या ड्रोनद्वारे घातक बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने शत्रूंची ठिकाणे उद्ध्वस्त करता येऊ शकतात.

 

फ्रान्सनेही सन २०१३मध्ये या दोन ड्रोनची मागणी नोंदवली होती. तर, ग्रीसने सन २०२२मध्ये तीन ड्रोन खरेदी केले होते. तसेच, स्पेन, ब्रिटन, नेदरलँड आणि इटलीनेही हे ड्रोन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा