संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे

भारताला ऑगस्टपासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळणार आहे. यानंतर भारताला दहशतवादविरोधी लढा, सुरक्षा आणि शांतता यांसारख्या विविध प्रश्नांवर निर्णय करावा लागणार आहे.

भारत २ ऑगस्ट २०२१ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षस्थानावर आरुढ होणार आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताची स्थायी प्रतिनिधी टी एस तिरूमुर्ती या संदर्भात मिश्र स्वरुपात पत्रकार परिषद संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात घेणार आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये सुरक्षा परिषदेसमोरील सुमारे महिन्याभराच्या कार्यक्रमावर चर्चा केली जाण्याची शक्यता व्यक्त जात आहे.

हे ही वाचा:

…म्हणूनच त्याने विरारच्या बँकेत घातला होता दरोडा

ठाणे शहर कशामुळे गुदमरते आहे? वाचा…

पुण्यात निर्बंधातून सूट नाही

हिंदू देवस्थानांबाबत कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय!

याबाबतीत आनंद व्यक्त करताना टी एस तिरूमुर्ती यांनी सांगितले की, ज्या महिन्यात आम्ही आमच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणार आहोत, त्याच महिन्यात सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारायला मिळणे हे अतिशय आनंददायक आहे. तिरूमुर्ती यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचा अस्थायी सदस्य म्हणून अध्यक्षपदावरील भारताची निवड २०२१- २०२२ या कारकीर्दीतील पहिलीच आहे. या नंतर अस्थायी सदस्य म्हणून सुरक्षा समितीचे सभासदत्त्व डिसेंबर २०२२ मध्ये संपुष्टात येत असताना भारत पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारेल.

तिरूमुर्ती यांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशामध्ये सांगितले की भारताने कायमच सामुद्री सुरक्षेला प्राधान्य देणार आहे. त्याबरोबर दहशतवादविरोधी लढ्याला देखील प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Exit mobile version