कान्स चित्रपट महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’

कान्स चित्रपट महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’

भारत हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरा करत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर गेले होते. तेव्हा एकीकडे पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रोन यांची भेट होत असतानाच दुसरीकडे कान्स फिल्म फेस्टिव्हल संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारताला या महोत्सवात ‘कंट्री ऑफ ऑनर’चा मान मिळाला आहे.

जगभरामध्ये ‘कान्स फिल्स फेस्टिव्हल’ची चर्चा होत असते. या चित्रपट महोत्सवाला मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. कान्समध्ये आपला चित्रपट सहभागी होणं हा दिग्दर्शकांसाठी वेगळी पर्वणी असते. अशा कान्स चित्रपट महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ असा बहुमान मिळाला आहे. शिवाय असा बहुमान मिळवणारा भारत पहिला देश आहे. त्यामुळे कान्स महोत्सवच्या निमित्ताने भारताला चित्रपट क्षेत्रात मोठी संधी निर्माण होणार आहे. प्रत्येक वर्षी हा मान मिळवणारा देश नवा असणार आहे. मात्र, या बहुमानाची सुरुवात भारतापासून झाली आहे.

हे ही वाचा:

संदीप देशपांडे, संतोष धुरी विरोधात गुन्हा दाखल

राणा दाम्पत्याला अटी- शर्तींसह जामीन मंजूर

नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय

राज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान

केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. कान्समध्ये जी संधी भारताच्या वाट्याला आली आहे त्यामुळे पाच वेगवेगळे स्टार्ट अप्स सुरु करता येणार आहेत. या संधीच्या निमित्ताने भारताला काहीतरी नवीन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. तसेच कान्समध्ये भारताला मिळालेली संधी ही सुवर्णसंधी असल्याचे अनुराग यांनी म्हटले आहे.

Exit mobile version