‘भारत होईल अवघ्या विश्वाच्या विकासाचे इंजिन’

पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला विश्वास

‘भारत होईल अवघ्या विश्वाच्या विकासाचे इंजिन’

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आले आहेत. इथे त्यांनी जोहान्सबर्गमध्ये ‘ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स डायलॉग’मध्ये संबोधित केले. भारताने साध्य केलेल्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी ऊहापोह केला. यावेळी त्यांनी भारताच्या स्टार्टअप्स व्यवस्थेकडे जगाचे लक्ष वेधले. ‘भारताकडे जगातील सर्वांत मोठा तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप यंत्रणा आहे. तसेच, देशात १००हून अधिक युनिकॉर्न उपस्थित आहेत. आगामी काळात भारत विश्वाच्या विकासाचे इंजिन बनेल’ असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

 

दक्षिण आफ्रिकेच्या तीनदिवसीय दौऱ्यावर दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती पाऊल माशातिले यांनी केले. तिथे मोदी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिले गेले. आफ्रिकेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा सहभाग असलेली ब्रिक्स परिषद होत आहे. ते येथे २४ ऑगस्टपर्यंत असतील.

 

हे ही वाचा:

अँटिलिया स्फोटके, मनसुख हत्याकांड प्रकरणी प्रदीप शर्माला जामीन मंजूर

इटलीत नोकरी देतो सांगितले; पण लिबियात सशस्त्र गटाच्या तावडीत सापडले

मतदानासाठी सचिन तेंडुलकर ‘नॅशनल आयकॉन’

प्रज्ञानंद- कार्लसन पहिला डाव बरोबरीत

प्रिटोरिया हिंदू सेवा समाजाचे कार्यकर्ते आणि बीएपीएस स्वामीनारायण संस्थानच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह भारतीय समाज मोठ्या संख्येने पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होता. त्यानंतर ते जोहान्सबर्ग येथील सँडसन हॉटेलला रवाना झाले. येथेच ब्रिक्स शिखर परिषद होत आहे. ‘ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स’मध्ये संबोधित करण्यापूर्वी त्यांनी स्थानिक आणि भारतीय समाजाच्या गटांशी संवाद साधला. तिरंगा आणि ढोलताशांसह उपस्थित भारतीय नागरिकांनी पंतप्रधान हॉटेलवर पोहोचताच त्यांचे स्वागत केले आणि ‘वंदे मातरम्’, ‘भारतमाता की जय’चे नारे दिले. यावेळी दोन महिलांनी मोदी यांच्या हातावर राखीही बांधली.

 

मोदी यांनी येथे होऊ घातलेल्या स्वामीनारायण मंदिराची प्रतिकृतीही पाहिली. हे मंदिर सन २०१७पासून साकारले जात असून पुढील वर्षी ते याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जोहान्सबर्गच्या उत्तरेकडे होणारे हे मंदिर पूर्णपणे दगडाचे बनले जाणार आहे. ‘ब्रिक्स देश विविध क्षेत्रांत एक मजबूत सहकार्य अजेंडा तयार करत आहेत,’ असे वक्तव्य फोरमला जाण्यापूर्वी मोदी यांनी केले.

Exit mobile version