जागतिक आनंदी देशांच्या जाहीर झालेल्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टमधील यादीत भारताला १२६वा क्रमांक देण्यात आला असला तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवाळखोर ठरलेला श्रीलंका, दहशतवादाने पोखरलेला पाकिस्तान, युद्धाने ग्रस्त रशिया आणि युक्रेन हे देश भारताच्या पुढे आहेत.
त्याबद्दल सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत असून श्रीलंका, पाकिस्तान, रशिया, युक्रेन यांच्या तुलनेत भारत दुःखी आहे यावरून या अहवालाची थट्टा उडविली जात आहे.
या यादीत १३७ देशांची नावे समाविष्ट करण्यात आली असून त्यात १२६व्या क्रमांकावर भारताला स्थान देण्यात आले आहे. फिनलंड हा देश सर्वाधिक आनंदी देश म्हणून मानला गेला आहे. त्यानंतर डेन्मार्क, आइसलँड, इस्रायल, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे या देशांचा क्रमांक लागतो. अफगाणिस्तान हा सर्वात दुःखी असलेला देश आहे.
हे ही वाचा:
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये
आज हुतात्मा दिन! याच दिवशी दिली होती भगत, सिंह, राजगुरू, सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
पण सर्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे ते भारतापेक्षाही आनंदी देश म्हणून पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश या देशांचा क्रमांक लागतो. पाकिस्तान १०८व्या क्रमांकावर असून श्रीलंका ११२, म्यानमार ११७ आणि बांगलादेश ११८ आहेत.
यासंदर्भात चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे की, एखादा देश आनंदी आहे की नाही हे
ठरविण्यासाठी पश्चिमी देशांची फूटपट्टी लावली जाते. हा अहवालच मुळात बोगस आहे. जर पश्चिमी देशांना विचारले की, आठवड्यातील किती दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमवेत एकत्र जेवता किंवा आयुष्यभर तुम्ही तुमच्या कुटुंबियांवर अवलंबून राहू शकता का?