22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियाखलिस्तानींच्या हल्ल्यांविरोधात भारताने कॅनडा सरकारला ठणकावले!

खलिस्तानींच्या हल्ल्यांविरोधात भारताने कॅनडा सरकारला ठणकावले!

भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांना यासंदर्भात भारताने पत्र पाठवून आपली रोखठोक भूमिका कळविली

Google News Follow

Related

खलिस्तानी समर्थकांनी कॅनडातील भारतीय दूतावासावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत भारताने कॅनडाला स्पष्ट शब्दात सुनावले आहे. फुटीरतावादी आणि दहशतवादी घटकांकडून तेथील भारतीय दूतावासावर जे हल्ले व आंदोलने केली जात आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांना यासंदर्भात भारताने पत्र पाठवून आपली रोखठोक भूमिका कळविली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हे पत्र ट्विट केले आहे.

भारताच्या परराष्ट्र खात्यातर्फे कॅनडाच्या उच्चायुक्तांकडे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. त्या लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, असे फुटीरतावादी घटक तिथे पोहोचतात कसे, त्यांना कशी काय परवानगी मिळते? पोलिसांच्या उपस्थितीत आणि ती सुरक्षा भेदून हे घटक आमच्या दूतावासापर्यंत कसे काय पोहोचू शकतात?

हे ही वाचा:

नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या आरोपींकडे सापडले सिम, मोबाईल फोन

हक्कभंगप्रकरणी संजय राऊत यांचा खुलासा समाधानकारक नाही, म्हणून…

उद्धव ठाकरे हे खरे दरोडेखोर!

कॅगचा अहवाल आला; महापालिकेवर दरोडा टाकणाऱ्यांचा बुरखा फाटणार

व्हीएन्ना कराराची आठवण कॅनडा सरकारला नाहीए का? या दहशत माजवणाऱ्यांना त्वरित अटक करा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या या घटकांवर कारवाई का केली जात नाहीए.

कॅनडा सरकार यासंदर्भात योग्य पावले उचलेल अशी अपेक्षा आहे. दूतावासातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी कॅनडा सरकार घेईल अशी आशा आहे. त्यामुळे नेहमीचे काम करण्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

सध्या भारतातच नव्हे तर जगातील काही देशांमध्ये खलिस्तानी समर्थकांनी उच्छाद मांडल्याचे दिसते आहे. भारतात सध्या पंजाबमध्ये खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडात भारतीय दूतावासावर हल्ले करण्याची हिंमत या खलिस्तानी समर्थकांनी दाखविली आहे. तेथील पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे वारंवार दिसते आहे. त्यामुळेच मागे ब्रिटनमध्ये दूतावासावरील तिरंगा काढण्याचा प्रयत्न या खलिस्तानी समर्थकांनी केला होता.

भारतात तर पंजाबमधील एका पोलिस ठाण्यावर समर्थकांनी हल्ला करून आपल्या सहकाऱ्याला सोडविण्याचा प्रयत्न केला. बंदुका, तलवारी घेऊन हे समर्थक तिथे पोहोचले होते मात्र पोलिसांकडून कारवाई झाली नव्हती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा