भारत, अमेरिका, चीनला मिळाल्या ६० टक्के लसमात्रा

भारत, अमेरिका, चीनला मिळाल्या ६० टक्के लसमात्रा

जागतिक स्तरावर आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या दोन अब्ज लसमात्रांपैकी सुमारे ६० टक्के अमेरिका, भारत आणि चीन या तीन देशांमध्ये वितरित केल्या आहेत असे जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार यांनी सांगितले. डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम घेबेरियससचे वरिष्ठ सल्लागार ब्रुस आयलवर्ड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

येत्या आठवड्यात दोन अब्जपेक्षा जास्त मात्रांचा टप्पा ओलांडू असेही यावेळी ते म्हणाले. सध्याच्या घडीला २१२ पेक्षा अधिक देशांमध्ये लस वितरित केले गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:

चित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम

दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

खासदारकीवर दृष्टी, PR चा कोन

महाराष्ट्रात कोरोना मृतांची संख्या १ लाखांच्या पुढे

या दोन अब्जपैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त लसमात्रा केवळ १० देशांमध्ये गेलेल्या आहेत. चीन, अमेरिका आणि भारत या तीन देशांमध्ये त्यापैकी ६० टक्के डोस आहेत. अधिक बोलताना ते म्हणाले, कोव्हॅक्सने १२७ देशांमधील लसमोहीमेस बळकटी दिली आहे. जागतिक स्तरावरील फक्त ०.५ टक्के डोस हे सर्वात कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये गेले आहेत.

उच्च उत्पन्न असणारे देश आजही मात्र या सर्व लसमात्रांपासून लांब आहेत. सध्याच्या घडीला आपण आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक संकटाच्या केंद्रस्थानी आहोत. यातून बाहेर पडणे हे खूप महत्त्वाचे आहे. कोव्हॅक्सद्वारे आत्तापर्यंत 80 दशलक्ष डोस वितरित केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version