भारत-अमेरिका भागीदारी भक्कम राहणार

भारत-अमेरिका भागीदारी भक्कम राहणार

“भारतशी असलेले संबंध हे दोन्ही पक्षांच्या कार्यकाळात सुधारत राहिले आहेत. भारत अमेरिका संबंध हे पक्षीय राजकारणापलीकडचे आहेत.” असे विधान नवीन परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकिंन यांनी केले आहे. अमेरिकेतील सिनेटसमोर बोलत असताना ब्लिंकिंन यांनी हे विधान केले. यातून भारत अमेरिका संबंध हे नव्या सरकारच्या काळातही चांगलेच राहतील अशी आशा आहे.

भारत चीन सीमा विवादाच्या पार्श्वभूमीवर हे विधान अंत्यत महत्वाचे आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेने चीनविरोधात कठोर भूमिका घेतली होती. चीनच्या शिंजियांगमधील छळछावण्यांवरही कारवाई केली होती. तिबेटच्या प्रश्नावरही संसदेत कायदा केला होता. परंतू नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन  यांच्याबद्दल अनेक चर्चा निवडणुकीदरम्यान केल्या जात होत्या. यामध्ये बायडन यांचा मुलगा एका चिनी कंपनीत मोठ्या पदावर आहे अशीही माहिती पुढे आली होती. त्यामुळे चीनशी असलेली प्रतिस्पर्धा आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन, बायडन वैयक्तिक कारणांमुळे संबंध सुधारणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर ब्लिंकिंन यांचे विधान या चर्चांना पूर्णविराम देणारे आहे.

भारताने रशियाकडून एस-४०० खरेदी करणे स्वीकारार्ह नाही असेही त्यांनी पुढे सांगितले. त्यामुळे भारत अमेरिका संबंधांमधील हा एक मुद्दा वादाचा राहणार असे समजते.

त्याचबरोबर नवीन डिफेन्स सेक्रेटरी (संरक्षण मंत्री) स्टिव्ह ऑस्टिन यांनी असे सांगितले की “भारताशी असलेले लष्करी संबंध अधिक दृढ करून सैन्य अभ्यासातील सुसूत्रता वाढवण्याकडे माझे लक्ष असेल.” अमेरिकेच्या नवीन संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे भारत-अमेरिका संबंधांबद्दल आश्वस्तता निर्माण झाली आहे.

Exit mobile version