रशिया-युक्रेन प्रश्न चर्चेतून सोडवावा

रशिया-युक्रेन प्रश्न चर्चेतून सोडवावा

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरु असलेला संघर्ष हा साऱ्या जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. दिवसागणिक हा संघर्ष अधिकच चिघळताना दिसत आहे. त्यातच रशियाने आता युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र असल्याची मान्यता दिल्यामुळे हा वाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने एक महत्वाची विशलेष बैठक बोलावली होती.

या बैठकीत भारताने हा विषय चर्चेतून आणि सामंजस्यातून सोडवावा अशी भूमिका घेतली आहे. दोन्ही देशांमध्ये वाढत जाणारा तणाव कमी करण्याची आवश्यकता आहे असे भारताने म्हटले आहे. या विषयातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून होत असलेल्या प्रयत्नांना आपण वेळ दिला पाहिजे. आपल्याला सैनिकी बळ वापरणे परवडणारे नाही असेही भारताने म्हटले आहे. भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी ही भूमिका संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत मांडली आहे.

हे ही वाचा:

‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’

भीमा-कोरेगाव आयोगाने पवारांची केली तासभर चौकशी!

रशिया-युक्रेन संकटामुळे शेअर बाजार कोसळला….

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये दोन दहशतवादी अटकेत

युक्रेनमधील डोनेट्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता देण्याच्या करारावर रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांनी सही केली आहे. रशियाच्या या चालीमुळे रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देशांमधील युद्ध अटळ आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. या रशियाने प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता दिल्यामुळे आता युक्रेन रशिया संघर्ष वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशिया आता उघडपणे या फुटीरतावाद्यांना सैनिकी मदत पुरवून या दोन्ही प्रदेशांवर कब्जा मिळवण्यासाठी आणि युक्रेनियन सैन्याचा सामना करण्यासाठी मदत करू शकते. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष रशियाकडे लागले आहे.

Exit mobile version