१ मे पासून कार्यान्वित होणार भारत-युएई मधील हा विशेष करार!

१ मे पासून कार्यान्वित होणार भारत-युएई मधील हा विशेष करार!

जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

भारत आणि संयुक्त अरब अमिराती अर्थात युएई यांच्यातील एक विशेष करार हा येत्या १ मे पासून कार्यान्वित होत आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार असणार आहे. सीईपीए (CEPA) म्हणूनही हा करार प्रसिद्ध आहे. या संदर्भात बोलताना हा ऐतिहासिक करार नव्या अध्यायाची सुरुवात असून, असाधारण फलश्रुती आणि आपल्या व्यापार संबंधांमध्ये तो एक आदर्श परिवर्न घडवून आणेल असे वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले आहेत.

भारत, यूएईकडे आफ्रिका, इतर जीसीसी (आखाती सहकार्य परिषद देश) आणि मध्य पूर्वेतील देश, सीआयएस देश तसेच काही युरोपीय देशांचे प्रवेशद्वार म्हणून पाहत असल्याचेही गोयल म्हणाले.

“हा करार जगभरातील महत्त्वाच्या बाजारपेठांचे दरवाजे खुले करणारा आहे . म्हणून जेव्हा आम्ही या मुद्यावर एकमेकांशी व्यवहार करायचे ठरवले, तेव्हा युएईमधील १० दशलक्ष लोकसंख्येशीच नव्हे, तर फारच मोठा पट आमच्या नजरेसमोर होता. सीईपीए, उभय पक्षांना खूपच मोठी व्यवसाय संधी उपलब्ध करणार आहे असे गोयल यांनी या बैठकीत सांगितले. यावेळी यूएईचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री, थानी अल झेयोदी उपस्थित होते.

हे ही वाचा:

मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!

महाराष्ट्रातील या ठिकाणांवर होणार ग्रीनफिल्ड विमानतळ

प्रवीण दरेकरांना पुन्हा दोन आठवड्यांचा दिलासा!

पालिकेची पलटी; नारायण राणेंच्या अधीश बंगल्याला दिलेली नोटीस घेतली मागे

व्यापार आणि सेवांचा समावेश असलेल्या,भारत-यूएई सीईपीए व्यापार करारावर ८८ दिवसांच्या विक्रमी अल्पावधीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या वस्तुस्थितीसह अशा अनेक बाबी आहेत ज्या पहिल्यांदाच होत आहेत असे गोयल यांनी नमूद केले.

“हा करार केवळ व्यापाराविषयी नाही, तो केवळ वस्तू आणि सेवांच्या व्यापाराविषयी नाही; मला वाटते की यात प्रचंड भू-राजकीय, आर्थिक आणि युएईमधील भारतीय नागरीकांची विशाल उपस्थिती लक्षात घेता यात एक महान मानवी मूल्यदेखील आहे”, असे गोयल म्हणाले.

भारत-यूएई भागीदारी “21 व्या शतकातील परिभाषित धोरणात्मक भागीदारी” असल्याचे त्यांनी सांगितले. हा करार या नात्याला एक नवी दिशा देतो, एक परिवर्तन घडवून आणतो, असे ते म्हणाले.

Exit mobile version