आजपासून भारत सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानी

आजपासून भारत सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानी

भारताने आज पासून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. याबद्दल रशियाकडून भारताचे अभिनंदन करण्यात आले. जागतिक प्रश्नांना महत्त्व देण्याच्या आणि नाविक शांतते बरोबरच दहशतवाद विरोधाला प्राधान्य देण्याच्या भारताच्या भूमिकेमुळे प्रभावित झाले असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले आहे. भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारल्यानंतर रशियाच्या राजदूताकडून अभिनंदनपर ट्विट करण्यात आले.

रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय कुडाशेव यांनी ट्विट करताना म्हटले आहे, “संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारल्याबद्दल भारताचे अभिनंदन! नाविक शांतता, दहशतवाद विरोध अशा जागतिक मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या अजेंड्यामुळे प्रभावित झालो आहोत. खूप खूप शुभेच्छा”रशिया बरोबरच फ्रान्सने देखील भारताचे अभिनंदन केले आहे. सुरक्षा परिषदेचे अध्यक्षस्थान भारताने फ्रान्सकडून स्वीकारले आहे. फ्रान्सच्या भारतातील राजदूताने देखील ट्विटर वरून भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.भारत हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. भारताचा सदस्य काळ दोन वर्षांसाठी आहे. भारत १ जानेवारी २०२१ रोजी अस्थायी सभासद म्हणून परिषदेत सामील झाला होता. भारत आठव्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये अस्थायी सभासद म्हणून सामील झाला आहे.

हे ही वाचा:

बीसीसीआयने धमकावल्याचे माजी क्रिकेटपटूचे आरोप

राहुलची राहुलला ‘प्रेम’ळ चपराक

पीव्ही सिंधू पराभूत होऊनही पदकाची आशा?

अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका

१५ देश सभासद असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या या महत्त्वाच्या परिषदेचे अध्यक्षस्थान एक महिन्यासाठी भारताकडे सोपविण्यात आले आहे.भारताच्या कार्यकाळाविषयी बोलताना भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी टी एस तिरुमुर्ति यांनी सांगितले की दहशतवाद विरोधी लढ्यातील अग्रणी देश म्हणून भारत दहशतवाद विरोधात वरच आपले लक्ष एकवटणार आहे. त्याबरोबरच तिरुमुर्ति यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जय शंकर यांचादेखील आभार मानले होते.भारताने आज जरी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असली तरी प्रत्यक्ष कामकाजाला सोमवार २ ऑगस्ट २०२१ पासून सुरुवात होणार आहे. या दिवशी तिरुमुर्ति मिश्र पद्धतीतून पत्रकार परिषद घेणार आहेत.

Exit mobile version