रशियामध्ये झापड २०२१ या लष्करी सराव कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. ३ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. ‘झापड’ हा बहुराष्ट्रीय सैनिकी सराव कार्यक्रम आहे. रशियामध्ये होणारा झापड हा बहुराष्ट्रीय सैन्य सराव कार्यक्रम आहे. झापड २०२१ या सराव अभ्यासक्रमात युरेशिया आणि दक्षिण आशियातील जवळपास १२ पेक्षा अधिक देश दहभागी होणार आहेत.
भारतीय लष्करातील जवानांची तुकडी झापड २०२१ या सराव कार्यक्रमात सहभागी होत आहे. या तुकडीत २०० भारतीय जवान आहेत. भारतीय लष्कराच्या नागा बटालियनच्या जवानांची ही तुकडी आहे. नागा बटालियन संघ सर्व शस्त्रांनी सुसज्ज अशा एकत्रित कृती दलाचे प्रदर्शन करणार आहे.
हे ही वाचा:
देशात शाळा झाल्या सुरू; महाराष्ट्राचे काय?
२०२५ पर्यंत होणार क्षयरोग मुक्त भारत
ठाकरे सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही
दहशतवाद विरोधी कारवाईचे नियोजन आणि अंमलबजावणी यासाठी एकत्र येताना, या सरावात सहभागी होणाऱ्या सर्व देशांदरम्यान लष्करी तसेच धोरणात्मक नातेसंबंध अधिक उत्तमपणे जोपासलेले असावेत या उद्देशाने या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सरावात भाग घेणाऱ्या भारतीय लष्कराच्या तुकडीला कठोर प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागला असून त्यात यांत्रिक, हवाई आणि हेलिबॉर्न, दहशतवादविरोधी कारवाई, युद्धजन्य परिस्थिती आणि गोळीबार यांच्यासह पारंपरिक कारवायांच्या सर्व पैलूंचा समावेश करण्यात आला होता.
#IndianArmy contingent will participate in Multi Nation Exercise #ZAPAD2021 being held at Nizhniy, Russia from 03 to 16 Sep 2021. More than dozen countries from Eurasia and South Asia will also participate in the same exercise.#IndianArmy#StrongAndCapable pic.twitter.com/7sSmSoi9Zl
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) September 1, 2021