भारतीय लष्कराने उत्तरेतील सीमेवर गलवान खोऱ्यातील हिंसेनंतर संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. परंतु केवळ संख्या वाढवून भारतीय लष्कर थांबलेले नाही तर, भारतीय लष्कराने चीनला नमवण्यासाठी भारतीय जवानांना ‘तिबेटॉलॉजी’ म्हणजेच तिबेटी भाषा आणि संस्कृतीबद्दल शिकवणार आहे.
भारतीय सेना सध्या जवानांना तिबेटच्या संस्कृती, इतिहास आणि भाषेबद्दल शिकवण्यासाठी आराखडा आखत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंना असलेल्या तिबेटी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी सेना तयार आहे. चीनचा दुष्प्रचार आणि प्रभाव रोखण्यासाठी भारतीय सेनेने ही रणनीती आखल्याची सूत्रांकडून सूत्रांकडून मिळाली आहे.
तिबेटोलॉजी विषयात जवानांना तयार करण्याचा पहिला प्रस्ताव ऑक्टोबरमध्ये समोर आला होता. सिमल्यात असलेल्या आर्मी ट्रेनिंग कमांड (एआरटीआरएसी) लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
एआरटीआरएसीच्या प्रस्तावाअंतर्गत तिबेटोलॉजीसाठी सेनेतील अधिकाऱ्यांना भारतातील काही विद्यापीठांमध्ये पाठवण्यात यावे. भारतात काही विद्यापीठांमध्ये तिबेटॉलॉजी या विषयात पदवी दिली जाते. यामध्ये दिल्ली विद्यापीठ, वाराणसीमधील केंद्रीय विद्यापीठ, बिहारमधील नव नालंदा महाविहार, पश्चिम बंगालमधील विश्व भरती, गंगटोकमधील नामग्याल विद्यापीठ आणि बंगलोरमधील दलाई लामा विद्यापीठ यांचा समावेश आहे.
‘भारतीय सेनेला पाकिस्तानच्या भाषा, इतिहास आणि संस्कृतीची चांगली माहिती आहे. परंतु चीनमधील कोणत्याही भागाबद्दल विशेष माहिती भारतीय सेनेकडे नाही. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे.” अशी माहिती भारतीय सेनेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
भारत आजवर तिबेटच्या मुद्द्यावरून चीनला घेरण्यापासून स्वतःला रोखत आलेला आहे. काही विश्लेषकांच्या मते भारत १९५४ मधेच तिबेट गमावून बसला होता, जेंव्हा जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने चीनशी व्यापार करार केला. या करारामध्ये भारताने तिबेटला चीनचा एक भाग म्हणून मान्य केले होते. आज अनेक दशकांनंतर भारत सरकार ही स्थिती बदलू पाहत आहे.