२०२५ च्या अखेरीस भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, तर २०३० च्या अखेरीस भारत टॉप ३ मध्ये असेल. ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ च्या अहवालात असे भाकीत केले आहे. सीईबीआर हा युके मधील महत्वाचा थिंक टॅंक आहे.
२०१९ मध्ये अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताचा पाचवा क्रमांक होता. यावर्षी कोविड परिस्थितीमुळे भारताची एका क्रमांकाने घसरण झाली आणि युके पुन्हा पाचव्या क्रमांकावर आला. पण २०२५ पर्यंत भारत पुन्हा एकदा युकेला मागे टाकत पाचवा क्रमांक परत मिळवेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.
‘सीईबीआर’च्या अहवालानुसार २०२१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ९ टक्क्यांनी वाढेल तर २०२२ मध्ये ही वाढ ७% असेल. भारत २०२५ मध्ये युकेला, २०२७ मध्ये जर्मनीला आणि २०३० मध्ये जपानला मागे टाकेल. २०२८ मध्ये अमेरिकेला मागे टाकून चीन जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल असेही या अहवालात म्हटले आहे.