भारताने जगासाठी केला कोविड-१९ लसींचा विक्रमी पुरवठा

भारताने जगासाठी केला कोविड-१९ लसींचा विक्रमी पुरवठा

जगातील सर्वात मोठा औषध उत्पादक देश असलेल्या भारताने कोविड-१९ वर परिमाणकारक ठरलेल्या कोविशिल्ड या लशींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा साऱ्या जगाला केला. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारताने एकूण जवळपास २२ कोटी ९७ लाख लशींचा पुरवठा विविध देशांना केला. यामध्ये जगातील अनेक देशांचा समावेश आहे.

हे ही वाचा: कॅनडालाही होणार भारताच्या लसमैत्रीचा फायदाभारताच्या लसमैत्रीचे शतक

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितल्यानुसार भारताने आत्तापर्यंत एकूण २२ कोटी ९७ लाख लसींचा पुरवठा केला असून ६ कोटी ४७ लाख लसी या देणगी दाखल देण्यात आल्या आहेत, तर १६ कोटी लशींचा पुरवठा व्यावसायिक स्तरावरून करण्यात आला आहे.

ही तर भारताने आत्तापर्यंत पुरवलेल्या लसींची आकडेवारी आहे. यापुढेही भारत इतर देशांना लसींचा पुरवठा करत राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि पॅसिफिक बेटांवरील देशांना लसींचा पुरवठा करणार आहे.

हे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की हा पुरवठा राष्ट्रीय लसीकरण मोहिमेच्या गरजा आणि आंतर्देशीय मागणी लक्षात घेऊनच केला जाणार आहे.

आम्ही पुढील लसींचा पुरवठा टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे. येत्या आठवड्याभरात भारत आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि पॅसिफिक बेटांवरील देशांना लसींचा पुरवठा करण्याची शक्यता आहे.

Exit mobile version