काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले

भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर बोलणाऱ्या पाकिस्तानला भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर पुन्हा एकदा फटकारले आहे.

काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले

The Minister of State for External Affairs and Culture, Smt. Meenakashi Lekhi addressing a press conference to make an important announcement of Culture Ministry in connection with Republic Day Celebration, in New Delhi on November 12, 2021.

भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर बोलणाऱ्या पाकिस्तानला भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर पुन्हा एकदा फटकारले आहे. कझाकिस्तान येथे कॉन्फरन्स ऑन इंटरऍक्शन ऍन्ड कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजरर्स (CICA) शिखर संमेलनात युक्रेन संकटावर चर्चा सुरू होती. त्यावेळी पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावर मत मांडले. त्याला भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी रोखठोख प्रत्युत्तर दिलं आहे.

गुरुवार, १३ ऑक्टोबर रोजी आयोजित या शिखर संमेलनात अनेक जागतिक नेत्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये युक्रेन संकटावर प्रामुख्याने चर्चा झाली तर इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काश्मीर मुद्द्यावरुन भारतावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्यांनी भारत सरकारवर कश्मीरमधील लोकांवर होत असलेल्या आत्याचाराचा आरोप लावला. तसेच काश्मीर मुद्द्यावर भारतासोबत चर्चा करण्यास आपण इच्छूक होतो. पण अर्थपूर्ण आणि परिणामकारक चर्चेसाठी दिल्लीत सरकारची तयारी नाही. त्यांनाही यासाठी पुढाकार घ्यावा, अशी टिपण्णी शहबाझ शरीफ यांनी केली.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलेल्या टिपण्णीला परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी रोखठोक भाषेत पाकिस्तानला सुनावले आहे. “भारताच्या अंतर्गत प्रश्नावर टिप्पणी करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. पाकिस्तानकडून आलेलं वक्तव्य म्हणजे भारताच्या अंतर्गत प्रश्नावर, प्रदेशिक अस्मिता आणि सार्वभौमत्व यामध्ये हस्तक्षेप आहे,” असं त्या म्हणल्या.

“शेजारी असणारा देश भारतातील दहशतवादी कारवायांचे केंद्र आहे. पाकिस्तान मानव विकासात कोणतीही गुंतवणूक करत नाही. पण दहशतावदासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी संसाधने उपलब्ध करून देत आहे,” अशी सणसणीत टीका मीनाक्षी लेखी यांनी पाकिस्तानवर केली आहे.

हे ही वाचा:

मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

मीनाक्षी लेखी हे ही म्हणल्या की, “पाकिस्तानने भारताविरोधात खोट्या आरोपांचा प्रचार करण्यासाठी पुन्हा एकदा CICA शिखर परिषदेचा वापर केला, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. पाकिस्तानने CICA शिखर परिषदेच्या मंचावरुन सदस्य देशांचं मुख्य विषयावरुन लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य घटक आहे आणि राहणार. पाकिस्तानने आमच्या अंतर्गत प्रकरणामध्ये ढवळाढवळ करु नये,” असे खडेबोल लेखी यांनी पाकिस्तानला सुनावले आहेत.

Exit mobile version