27 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरदेश दुनियाखलिस्तानी दहशतवादी निज्जर प्रकरणी तथ्यहीन दावे करणाऱ्या कॅनडाला भारताने फटकारले

खलिस्तानी दहशतवादी निज्जर प्रकरणी तथ्यहीन दावे करणाऱ्या कॅनडाला भारताने फटकारले

निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा कॅनडाचा आरोप

Google News Follow

Related

भारत आणि कॅनडा यांच्यामधील तणाव वाढत असून खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने काही महिन्यांपूर्वी केला होता. मात्र, भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले होते. आता नुकतेच कॅनडाने एका प्रकरणाच्या तपासात भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. यावरून आता भारताने एक पत्रक प्रसिद्ध करत कॅनडाला फटकारलं आहे.

निज्जर याच्या हत्येच्या तपासात कॅनडाने भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ म्हणून नाव दिल्याने वादाची परिस्थिती उद्भवली आहे. भारताने याला ताबडतोब प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, कॅनडावर पुराव्याशिवाय आपल्या अधिकाऱ्यांची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. शिवाय कॅनडाकडून तथ्यहीन दावे करण्यात आले आहेत.

भारतीय बाजूने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पंतप्रधान ट्रूडो यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये काही आरोप केले होते, आमच्या बाजूने अनेक विनंती करूनही, कॅनडाच्या सरकारने एकही पुरावा भारत सरकारला सादर केलेला नाही. तपासाच्या निमित्ताने राजकीय फायद्यासाठी भारताची बदनामी करण्याची ही जाणीवपूर्वक केलेली रणनीती आहे यात शंका नाही. उच्चायुक्त संजय कुमार वर्मा हे भारतातील वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांची ३६ वर्षांची प्रतिष्ठित कारकीर्द आहे. ते जपान आणि सुदानमध्ये राजदूत राहिले आहेत. तसेच त्यांनी इटली, तुर्की, व्हिएतनाम आणि चीनमध्येही सेवा बजावली आहे. कॅनडाच्या सरकारने त्याच्यावर लावलेले आरोप हास्यास्पद आहेत,” असं भारताने म्हटलं आहे.

हे ही वाचा :

बाबा सिद्दिकी यांच्यासोबत झीशान सिद्दिकीही होते टार्गेटवर

नेमबाज स्वप्निल कुसाळेला २ कोटी रुपये तर गोळाफेकपटू सचिन खिलारीला ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द!

उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी

मुंबईहून उड्डाण करणाऱ्या एअर इंडियासह इंडिगोच्या दोन विमानांना बॉम्बची धमकी

२०१८ मध्ये भारत दौऱ्यावर असतानाही ते व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी आले होते. त्यांच्या मंत्रिमंडळात कट्टरतावाद आणि भारताविरुद्ध फुटीरतावादाशी थेट संबंध असलेल्या अनेकांचा समावेश आहे. डिसेंबर २०२० मध्ये भारताच्या अंतर्गत राजकारणात त्यांचा हस्तक्षेप स्पष्टपणे दिसून आला. आता सरकारने सोमवारी कॅनडात भारतीय उच्चायुक्तांना एका प्रकऱणात सहभागी असलेली व्यक्ती असल्याचं संबोधल्याने जस्टिन ट्रूडो सरकारने भारताची बदनामी करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असून त्यांचा हा एक राजकीय अजेंडा आहे, असं म्हणत भारताने कॅनडाला फटकारलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा